क्राईम
श्रीगोंदा तालुक्यातील या महिलेचा संशयास्पद मृत्यू

मृतदेह जंगलात पुरल्याचा धक्कादायक प्रकार
श्रीगोंदा प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू संशयास्पद झाल्याचा समोर आले आहे यामुळे या मृत्यूची तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत
सदर महिलेचा मृतदेह जंगलात नेऊन पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . आळंदी चाकण रस्त्यावरील वन विभागाच्या जंगलातून 6 /10/ 2022 रोजी रात्री हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे
आशा गोरक्षनाथ देशमुख असे या मयत महिलेचे नाव आहे. ही महिला गेल्या महिन्यापासून गायब झाली होती. महिलेच्या पतीने चाकण पोलिसांत तशी तक्रार दिली होती.
आरोपींनी सदर महिलेचा मृतदेह जमिनीमध्ये पुरलेला होता त्यामुळे तो कुजलेल्या अवस्थेत सापडला. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे यामहिलेच्या मृत्यू मागचे कारण अद्याप पुढे आले नाही