अकोल्यात आंबित पाठोपाठ ,पिंपळगाव खांड भरले!

मुळा पणलोटात पाऊस सुरूच,
मुळा धरणाकडे आवक सुरू
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील मुळा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने मुळा नदीवरील अंबित पाठोपाठ आता पिंपळगाव खांड धरण भरले आहे
मुळा नदीवरील 193 दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबित धरण तीन दिवसापूर्वी भरले त्यानंतर आज बुधवारी 600 दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो झाले

या वर्षीच्या पावसाळ्यात अकोल्यातील हे दुसरे धरण भरले आहे पिंपळगाव खांड धरणातील पाणीसाठा आता
राहुरी तालुक्यातील मुळा धरणाकडे झेपावला आहे मुळा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर टिकून असल्याने मुळे चा प्रवाह कालपासून वाढला यामुळे पिंपळगाव खांड धरण भरले धरणातील जलसाठा आता नागरिकांचे आकर्षण बनले आहे परिसरातील या अथांग जलाशयाचे निसर्ग सौंदर्यया कडे लोक आकर्षित होऊ लागले आहे 26 टी एम सी साठवण क्षमतेचे मुळा धरणाकडे आता मुळा नदी पात्रातून आवक सुरू आहे