इतर

अकोले तालुक्यात वाकी जलाशय ओव्हरफ्लो

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यात संततधार पाऊस पडत असल्याने अंबित, पिंपळगाव खांड नंतर आता वाकी जलाशय ओव्हरफ्लो झाला आहे
वाकी भरल्याने या जलाशयातील पाणी निळवंडे धरणाकडे सुरू आहे कृष्णा वंती नदीवरील वाकी पाटबंधारे प्रकल्प 112 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे सदर वाकी प्रकल्प भरल्याने अकोले तालुक्यातील व जिल्ह्यातील हे तिसरे धरण भरले आहे यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीला मुळा नदीवरील 193 दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचे आंबेत धरण भरले त्यानंतर मुळा नदीवरील 600 दशलक्ष घनफूट क्षमतेचे पिंपळगाव खांड दुसरे धरण भरले प्रवरा पाणलोट क्षेत्रातील कृष्णा नदीवरील वाकी धरण ओसंडून वाहू लागलेआहे अकोले तालुक्यात पावसा ची धुवाधार बॅटिंग सुरू असल्याने ओढे-नाले खळखळून वाहत आहे डोंगर रांगा वरील धबधबे निसर्ग सौंदर्य खुलले आहे यामुळे अकोले तालुक्यातील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांचा ओघ आता अकोल्या कडे सुरू झाला आहे अकोले तालुक्यात सर्वदूर पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील निसर्ग सौंदर्य फुलू लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button