सर्वोदय विदयालयाचे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धांत नेत्रदिपक यश.

अकोले/प्रतिनिधी–
क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अकोले तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अगस्ती महाविदयालय अकोले येथे संपन्न झाल्या.
या हॉलीबॉल स्पर्धांत तालुक्यातील गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजुर येथील संघांनी नेत्रदिपक कामगिरी करत तालुकास्तरावर यश संपादन केले आहे.या स्पर्धांत १७ वर्षे वयोगटातील मुले व मुली तसेच १९ वर्षे वयोगटातील मुली या तिन्ही संघांनी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. या तिन्ही संघांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
त्याचप्रमाणे १९ वर्षे वयोगटातील मुलांचा संघ व १४ वर्षे वयोगटातील मुलींचा संघ हे उपविजेते ठरले आहेत.खेळाडूंनी तालुक्यातील अनेक दिग्गज संघांना पराभूत करत तालुकास्तरावर यश संपादन केल्याची माहिती क्रिडा शिक्षक जालिंदर आरोटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
सदर खेळाडूंना क्रिडा शिक्षक प्राचार्य भाऊसाहेब बनकर,जालिंदर आरोटे,विनोद तारू यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक तसेच गुणवंत खेळाडू यांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख,सचिव टि.एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन,संचालक मिलिंदशेठ उमराणी,मारूती मुठे,अशोक मिस्त्री, विजय पवार,प्रकाश टाकळकर, प्रकाश महाले,विलास पाबळकर,प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी,पालक यांसह क्रिडा समितिचे अध्यक्ष योगेश उगले,गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ साहेब,विस्तारअधिकारी सविता कचरे मॅडम,राजुर बिटचे केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव साहेब आदींनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.