
एकमत न झाल्याने विश्वस्त निवड रखडली
कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे आज विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते .
कोतुळ येथील श्रीक्षेत्र कोतुळेश्वर महादेव देवस्थान साठी विश्वस्त नेमण्यासाठी ही विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती मात्र विश्वस्त निवडीवरून मतभेद निर्माण झाल्याने विश्वस्त निवडीचा निर्णय या विशेष ग्रामसभेत झाला नाही

कोतुळ परिसराचे जागृत देवस्थान असणारे श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान चे नवीन विश्वस्त मंडळा ची मुदत संपल्याने नवीन विश्वस्त नेमणुकीसाठी आज गुरुवारी कोतुळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच भास्कर लोहोकरे होते या सभेला सुमारे 175 ग्रामस्थ उपस्थित होते
सभेच्या प्रारंभी ग्रामविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी या देवस्थानच्या विश्वस्त निवडणे विषयाची प्रस्तावना केली
कोतुळेश्वर देवस्थान साठी 5 ते 19 पर्यंतचे नवीन विश्वस्त नेमणूक करण्यासाठी सूचना मांडण्यात आली सभेत तब्बल 44 इच्छुकांची संख्या पुढे आली यामुळे ही निवड वादग्रस्त ठरली व विश्वस्त नेमणूक करता आली नाही
निवड न झाल्याने सभेचे कामाकाजाचे इतिवृत्त नगर येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आता धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील प्रकिया पार पडणार आहे
विश्वस्त निवडीवर कोणताही निर्णय यावेळी जाहिर केला नाही यामुळे आता धर्मदाय आयुक्तांचता निर्देशानुसार आता पुढील कार्यवाहि होणार आहे
या सभेत अगस्तीचे माजी संचालक सयाजीराव देशमुख , बाळासाहेब देशमुख जिल्हा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख जिल्हा परिषद सदस्य रमेश काका देशमुख कारखान्याचे मॅनेजर पोखरकर ,वकील डी डी देशमुख ,राजेंद्र पाटील देशमुख राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख , नेताजी आरोटे, रवींद्र आरोटे मनोज देशमुख भाऊसाहेब देशमुख बाळासाहेब देशमुख अभिजित देशमुख आदींनी आपले मते मांडली
मुस्लिम समाजाला स्थान द्यावे!
देवस्थान विश्वस्थ निवडी करताना या निवडीत गावातील गटतट बाजुला बाजूला ठेऊन सर्व समाजातील प्रतिनिधी असावेत यात मुस्लिम समाजाला देखील स्थान द्यावे असे मत राजेंद्र नानासाहेब देशमुख यांनी मांडले पार्ट्या आणि गट बाजूला ठेवून देवस्थान साठी वेळ देणाऱ्या व्यक्तींची सर्व समाजातून निवड व्हावी अशी मागणी यावेळी डी डी देशमुख यांनी केली

नावे सुचवण्या साठी चढाओढ!
देवस्थान वर विश्वस्थ निवडीचे नाव सुचविण्यासाठी मोठी चढाओढ या सभेत दिसून आली सूचक व अनुमोदक आळी पाळीने आपआपले बगलेतील एकमेकांचे नावे सुचवत होती त्याच त्याच व्यक्ती या सभेत एकमेकांचे नावे सुचवत होती अनेकांचे नावे अनेक वेळा सुचविले गेले यामुळे सामान्य नागरिकांना यात मत मांडणीचीसंधी मिळाली नसल्याची भावना काहींनी व्यक्त केली
——–////——