आमदार लहामटे म्हणाले आमचा पराभव भाजप नाहीतर काँग्रेसने केला!

दारू आणि गुटक्याने तरुणांनी शरीर नासवू नका
कोतुळ प्रतिनिधी
अकोले मतदार संघात 268 कोटीची विकास कामे सुरू आहेत अनेंक गावांना एक एक कोटींचा निधी दिला आहे अकोले शहराला विकासासाठी 14.5 कोटींचा निधी दिला असे असतानाही अकोले शहराने आमचा पराभव केला
अकोले नगरपंचायत निवडणुकीत धनदांडग्यांनी आपली मते विकली आणि लोकशाहीला अशोभनीय कृत्य झालं धनदांडग्यानी आपली मतं विकल्याने मला पराभव स्वीकारावा लागला मात्र हा पराभव भाजप ने नव्हे तर काँग्रेसने केला असा आरोप आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केला

कोतुळ (ता अकोले) येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते आमदार पुढे म्हणाले की
अकोले नगर पंचायत निवडणुकीत आमचा हा पर पराभव काँग्रेस ने घडून आणला आहे शहराला 14 कोटीचा निधी दिला सत्ता दिली असती तर आणखी कामे करत आली असती असे सांगितले आज तालुक्यात अनेक विकास कामे चालू आहे प्रत्येक गावाला आपण न्याय देत आहे मतदार संघ हे माझे कुटुंब आहे

गावात राजकारण येऊ न देता गुण्या गोविदाने नांदा वाईट गोष्टी बाजूला करून तरुणांनी गावाचा स्वतःचा विकास करा असे सांगत खेळाबरो बरच जीवनाचा आनंद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले
कोतुळ गावाला त्यांनी मोठी विकास कामे दिली म्हणून त्यांची गावातून भव्य दिव्य ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढली होती ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले यावर त्यांनी आभार मानत गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले
यावेळी राष्ट्रवादी चे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख म्हणाले मुळा खोऱ्यातील विकास कामासाठी आमदारांकडे सतत पाठपुरावा करू असे सांगत कोतुळ गावाला यापूर्वी कधीच आमदाराने एवढा निधी दिला नाही मात्र आमदार डॉ लहामटे यांनी कोतुळ गावाला एक कोटींचा निधी दिला याची आठवण जरून दिली
यावेळी युवा नेते अक्षय नरवडे यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेशकाका देशमुख, सरपंच भास्कर लोहकरे उपसरपंच संजय देशमुख ग्रामपंचायटी चे सदस्य , सौ उज्वला राऊत ,सदाशिव साबळे, विनोद देशमुख अरविंद देशमुख चंद्रकांत घाटकर सदाशिव कचरे आदी सह कोतुळेश्वर स्पोर्ट क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते