पारनेर तालुक्यात शहीद जवानांचे स्मारक उभारणार – कारभारी पोटघन

पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील अनेक लष्करी जवान सैन्यामध्ये काम करत असताना शहीद झाले असून या शहिदांचा सन्मान करण्यासाठी पारनेर तालुक्यांमध्ये अद्यावत “शहीद जवान स्मारक” उभारणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष कारभारी पोटघन मेजर यांनी दिली
निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आजी – माजी सैनिकांसाठी कार्यालय उभारण्यात येणार असून या कार्यालयाच्या माध्यमातून आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याची तालुकाध्यक्ष कारभारी पोटघन यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके व जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील आजी-माजी सैनिकांना विविध शासकीय योजना व सवलती याचा लाभ मिळण्या-साठी “अमृत जवान सन्मान अभियान” राबविणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष कारभारी पोटघन मेजर यांनी दिली .
आजी-माजी सैनिक संघटना, पारनेर तालुका कर्यकारणीची बैठक सोमवार दिनांक १३ जुन रोजी वाजता संघटनेचे अध्यक्ष कारभारी पोटघन व संघटनेचे मार्गदर्शक कर्नल साहेबराव शेळके तसेच सर्व सभासद यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
आजी-माजी सैनिकांच्या झालेल्या बैठकीमध्ये खालील मुद्यांवर चर्चा करण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने अमृत जवान सन्मान अभियान अंतर्गत आजी- माजी सैनिक , विरपत्नी , वीरमाता तसेच सर्व अर्धसैनिक बळ यांच्या अडचणी / तक्रारी अर्ज तहसीलदार कार्यलयात जमा केले होते. त्या विषयी माहिती घेणे. तसेच काही नवीन अर्ज मागविण्यात आले आहेत ते जमा करणे. एन डी ए तसेच एस एस बी साठी विद्यार्थ्यांना ले. कर्नल साहेबराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करणे. तरी सर्वाना सूचित करून या कार्यशाळेचा फायदा घेणे.पावसाळा सुरू झाला असून पुढील एक महिना वृक्षारोपण करावयाचे आहे. ते दोन टप्यात केले जाईल.प्रत्येक संघटना आप आपल्या गावी सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करतील. तालुका वृक्षारोपणाचा कार्यक्रम चुंभळेश्वर मंदिर परिसरात करण्यात येणार आहे, त्या कार्यक्रमाची रूपरेखा वेगळी सांगितली जाईल.२६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस समारंभ तालुका स्तरावर आयोजन करावयाचे आहे. त्यासाठी वेगळी बैठक घेतली जाईल.सैनिक संघटना पारनेर ही संघटना सैनिक सहायता केंद्रं असेल. प्रत्येकाने सर्व कामाची माहिती देऊन कार्यकारणीला अवगत करत राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष कारभारी पोटघन यांनी केले आहे.