
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील सुनील पहिलवान यांनी नुकत्याच श्रीरामपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून चांदीची गदा प्राप्त केली. या त्यांच्या यशाबद्दल शेवगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्याकडून कौतुक करून सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील पहिलवान यांनी कुस्ती या खेळामध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या १४८ वी जयंती निमित्त श्रीरामपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धत डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या अशा एकाचढ एक मल्लानी या ठिकाणी हजेरी लावली. यावेळी शेवगाव पोलीस निरीक्षक विलास पुजारी, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुखदेव गायकवाड, तालुका अध्यक्ष संतोष घरगणे, जयप्रकाश बागडे, ग्रामीण पत्रकार संघाचे रवींद्र मडके, आर आर माने, शहाराम आगळे, राधेश्याम महाराज बोरुडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.