भायगावात काल्याच्या कीर्तनाने पंढरपूर दिंडी सोहळ्याची सांगता

https://mahadarpan.in/?p=8639
शहाराम आगळे
शेवगाव तालूका प्रतिनिधी
श्री क्षेत्र देवगड संस्थांनचे मठाधिपती शांतीब्रह्म महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व गहिनीनाथ महाराज आढाव, विष्णु महाराज दुकळे, हरिभाऊ महाराज अकोलकर व नवनाथ बाबा भजनी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली भायगावचे ग्रामदैवत नवनाथ बाबा देवस्थानच्या भायगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यामध्ये भायगाव सह परिसरातील भाविक भक्त व महिला भाविकांनीही सहभाग घेतला होता. या दिंडी सोहळ्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यात विठुरायाचे दर्शन घेऊन भाविक आपआपल्या गावी परतले आहेत. या सोहळ्याची सांगता भायगावचे भूमिपुत्र श्री क्षेत्र नेवासा येथील ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख गहिनीनाथ महाराज आढाव यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता दिनांक 13 जुलै 2022 रोजी सायंकाळी तीन वाजता नवनाथ बाबा मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. त्यानंतर रामनाथ आबाजी झेंडे यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. परिसरामध्ये शिस्तप्रिय पायी दिंडी म्हणून नवनाथ बाबाच्या या दिंडी सोहळ्याकडे पाहिले जाते. सर्व गट तट विसरून मोठ्या भक्ती भावाने भाविक या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. त्यात दिंडी सोहळ्याचे हे १९ वे वर्ष होते. या दिंडी सोहळ्या मध्ये भाऊसाहेब महाराज शेकडे, महेश महाराज शेळके, अविनाश महाराज लोखंडे, प्रतिभाताई महाराज शेळके यांनी सहभाग नोंदवला आहे. तर नवनाथ भजनी मंडळ मध्ये बापूराव दुकळे, हरिश्चंद्र कानडे, लक्ष्मण आढाव, गोरक्षनाथ काळे, अशोक गेनू दुकळे, संतराम जराड, हरिचंद्र आढाव, एकनाथ सौदागर, सोपान चोपडे, बाबासाहेब आव्हाड, एकनाथ दुकळे, राजगुरू मिस्तरी, अशोक भालेकर, चोपदार अशोक जराड, रथ सेवक म्हणून वसंत मिसाळ, अशोक एकनाथ आढाव, नानासाहेब झेंडे यांनी सेवा केली. विणेकरी भागचंद महाराज धावणे होते. दिंडी सोहळ्यामध्ये सुदाम खंडागळे, गणपत आढाव, विठ्ठल प्रल्हाद आढाव, एकनाथ लांडे, नारायण आढाव, दिगंबर धावणे, ज्ञानेश्वर शेकडे, बाळासाहेब शेकडे, सदाशिव शेकडे, अण्णासाहेब दुकळे भगवान आढाव, रामनाथ आढाव, माणिक शेकडे, सखाराम लोखंडे, पांडुरंग आढाव, हरिश्चंद्र घाडगे, बाळासाहेब दुकळे, नानासाहेब दुकळे शिवाजी लांडे,यांनी दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेतला.
शेवगाव नेवासा राजमार्गावरील भायगाव येथील ग्रामदैवत नवनाथ बाबा देवस्थानच्या पायी दिंडी सोहळ्याचे हे १९ वे वर्षे होते. अतिशय आनंद व प्रसन्न वातावरणात नवनाथ बाबाच्या सजलेल्या रथासोबत तन व मनाने गावातील महाराज मंडळींच्या सहवासात वारी करण्याचा अनेकांनी आनंद घेतला. दिंडी सोहळ्याचा प्रवास नवनाथ भजनी मंडळाच्या भजनांनी वातावरण अधिकच प्रसन्न बनत गेले होते. मनोभावे विठुरायाचे दर्शन झाल्याचे समाधान अधिकच आहे.
- –हरिभाऊ महाराज अकोलकर
भायगाव
दोन वर्षाचा कोरोना काळ संपवून यंदा आषाढी वारी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यामध्ये भायगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन गावातील महाराज मंडळी व नवनाथ भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. अतिशय उल्हासात पायी प्रवास झाला. दिंडीचे नियोजनही चांगले झाले. दिवसेंदिवस नवनाथ बाबा देवस्थानच्या दिंडी सोहळ्याचे नियोजन व वारकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. याचा मनस्वी आनंद वाटतो.
— विठ्ठलराव प्रल्हाद आढाव
सामाजिक कार्यकर्ते