इतर

पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्यांच्यासाठी एकोप्याने काम करावे, आमदार मोनिका राजळे

पाथर्डी प्रतिनिधी
आगामी पाथर्डी नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी आहे. मात्र कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना इतर ठिकाणी व पक्ष संघटनेत पदावर सामावुन घेतले जाईल. ज्यांना पक्ष उमेदवारी देईल त्यांच्यासाठी एकोप्याने काम करावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले

शहरातील आप्पासाहेब राजळे बहुउद्देशीय सभागृहामधे भाजपाच्या शहरातील कार्यकर्त्यांची बैठक झाली.यावेळी त्या बोलत होत्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, अशोक चोरमले, अशोक गर्जे, नारायण धस, तालुका अध्यक्ष माणिक खेडकर, नंदकुमार शेळके, रामनाथ बंग, अमोल गर्जे, जनाबाई घोडके, काशीबाई गोल्हार, प्रविण राजगुरु, अनिल बोरुडे, बंडु बोरुडे,कोकाटे, डॉ. सुहास उरणकर, नामदेव लबडे, जगदिश काळे,मंगल बबन बुचकुल, बबन सबलस,आजीनाथ मोरे, रमेश गोरे, पांडुरंग सोनटक्के, अॅड. प्रतिक खेडकर,नितीन एडके, नारायण जाधव,शारदा हंडाळ, अर्चना फासे,
ज्योती मंत्री आदीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्यने उपस्थीत होते.


यावेळी बोलताना आ.राजळे म्हणाल्या नगरपालिकेत गेली पाच वर्ष भाजपाची सत्ता होती. पहीले अडीच वर्षे निधी मिळाला. त्यानंतर
राज्यात सत्तांतर होऊन महाआघाडीचे सरकार आले. त्यावेळी निधीची अडचण आली होती. आता
पुन्हा सरकार भाजपा-सेनेचे आले आहे. यापुढील काळात नगरपालिकेला विकासकामासाठी निधीची अडचण दूर झाली आहे.शहराच्या नवीन पाणी योजनेसह विविध विकासाच्या योजना मार्गी
लावण्यासाठी पालिकेत सत्ता आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असे
अवाहन आ.मोनिका राजळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button