भंडारादरा येथे आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव विभाग व आस्वस प्रतिष्ठान व इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक रोड यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन यांच्या वतीने करण्यात आले होते
या शिबिरामध्ये 600 हुन अधिक रुग्णांनी सहभाग नोंदवला या शिबिरासाठी नाशिक येथील 70 डॉक्टर ची टीम उपस्थिती होती शिबिरांमध्ये अस्थिरोग सांधेवात मेंदू रोग नेत्ररोग तसेच कॅन्सर सारख्या रोगांवर उपचार करण्यात आले विशेष म्हणजे शिबिरामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णाची जाण्याची व्यवस्था व चहा नाष्ट्याची व्यवस्था वन विभागाच्या वतीने करण्यात आली होती.
कुमशेत अंबित जानेवाडी या ठिकाणा हुन मोठे संख्याने रुग्ण उपस्थित होते वन्यजीव विभागाच्या वतीने अभयारण्यात राहणारे आदिवासी व्यक्तींचे चांगले आरोग्य मिळावे हाच प्रमुख उद्देश असल्याने आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केले असल्याचे नाशिक वन विभागाचे सहाय्यक वनरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांनी सांगितले

अभयारण्यात आदिवासी बांधव अतिशय खडतर जीवन जगत असून आरोग्याच्या बाबतीत या नागरिकांना आरोग्य चांगले राहता यावे आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन वनविभागाचे अधिकारी अमोल आडे यांनी सांगितले वनरक्षक अधिकारी दत्तात्रय पडवळे यांनी शिबिरासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची चौकशी करून विचारपूस करत होते शिबिर व्यवस्थित पार पाडण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे वनपाल रवींद्र सोनार,भास्कर कुठे ,शंकर लांडे, राजेंद्र चव्हाण, संजय गीते,चंद्रकांत तळपाडे महेंद्र पाटील, मनीषा सरोदे यांच्यासह वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले या वेळी राजूर चे पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, मा जि प. सदस्य सुनीताताई भांगरे प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांनी भेट दिली
