
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
जादूगार पी बी हंडे सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक विभाग आयोजित लोक सारथी गुणगौरव सोहळा २०२३ चे नुकतेच शिर्डी येथे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी राज्यभरातून 33 जणांची निवड करण्यात आली. हॉटेल साई गोल्ड इन शिर्डी येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातून विविध ठिकाणाहून लोक उपस्थित होते. नॅशनल गोल्डन अवॉर्ड राष्ट्रीय व अमृत महोत्सव राज्यस्तरीय असे दोन पुरस्कार 33 जणांना देण्यात आले. या कार्यक्रमासाठी पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे,सुरेशराव कोते कार्य संचालक लिज्जत पापड व जादूगार श्री भाऊसाहेब मंडलिक डॉ. शांताराम कारंडे उपस्थित होते. शेवगाव तालुक्यातील श्रीमती विद्या रामभाऊ भडके यांनाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शिवाजी हायस्कूल बोधेगाव येथील शिक्षिका विद्या रामभाऊ भडके यांची निवड करण्यात आली होती. या कार्यक्रम प्रसंगी त्यांना लोकसारथी नॅशनल गोल्ड अवार्डदेऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल शब्दगंध साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजेंद्र उदागे शब्दगंधचे सचिव सुनील गोसावी कवयत्री शर्मिलाताई गोसावी, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, शेवगाव तालुका अध्यक्ष हरिभाऊ नजन,शहाराम आगळे, शिवाजी विद्यालयाच्या शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.