कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान परिसरात मंगल कार्यालयाची उभारणी करावी अशी मागणी कोतुळ येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब भगवंता देशमुख यांनी केली आहे
श्री देशमुख यांनी म्हटले आहे की कोतूळ हे संपूर्ण मुळा परिसराचे मध्यवर्ती ठिकाण आहे परिसरातील 40 गाव डांग भागाची राजधानी म्हणून ओळखले जाते येथील श्री क्षेत्र कोतुळेश्वर हे जागृत देवस्थान असून मुळा परिसरातील भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठा यात्रा उत्सव भरतसातत्याने भाविकांची वर्दळ असते ठिकाणी मंगल कार्यालयासाठी बहुउद्देशीय सभागृहाची निर्मिती करून या ठिकाणी लग्न समारंभ व इतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुविधा सुरू करण्यात याव्या त अशी मागणी त्यांनी केली आहे इतर अकोले तालुक्यातील इतर देवस्थानच्या तुलनेत कोतुळेश्वर देवस्थान चा विकास राजकीय गटबाजीमुळे खुंटला असून ग्रामस्थांनी एकोप्याने या ठिकाणी लग्न समारंभ व इतर कार्यक्रमां साठी सोयीसुविधा निर्माण कराव्यात कोतुळेश्वर देवस्थानने पुढाकार घेऊन लग्न समारंभाचे विधिची या ठिकाणी सुरुवात करावी यामुळे अनेक गोरगरिबांचे लग्नकार्य सुरू होतील दोन वर्षाच्या कोरोना काळामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे यामुळे लग्न कार्यावर होणारा अफाट खर्च वाचण्यासाठी व लोकांना हातभार लागावा यासाठी देवस्थाने पुढाकार घेऊन कोतुळेश्वर देवस्थान परिसरात अल्पदरात लग्न समारंभाची सुरुवात करावी अशी मागणी श्री भाऊसाहेब देशमुख यांनी केली आहे राजकीय मतभेद बाजूला ठेऊन या ठिकाणी या सोयी सुविधा अल्प दरात सुरू केल्यास देवस्थान चा निश्चित विकास होण्यास मदत होईल श्री देशमुख यांनी म्हटले आहे