अकोल्यात ओबीसींचा जल्लोष!
अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव तथा ओबीसी आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बंठीया, आयोगाचे सदस्य महेश झगडे, ह.बा.पटेल, डॉ. नरेश गिते, डॉ.शैलेशकुमार दारोकर, प्रा.के.एस.जेम्स, सचिव पंकजकुमार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारला इम्पिरिअल डाटा गोळा करून राज्य शासनाला दिला व तो डाटा न्यायालयामध्ये शासनाने न्यायालयात दिला. याद्वारे न्यायानयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा मागास आरक्षणासाठी न्याय दिला.
ग्राहक पंचायत चे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपाचे तालुका सरचिटणीस तथा अकोले तालुका ओबीसी प्रभारी मच्छिंद्र मंडलिक यांनी मुख्यमंत्री ना शिंदे, उपमुख्यमंत्री ना. फडणवीस, ओबीसी नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.योगेश टिळेकर आदी नेत्यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आभार मानले.
यावेळी भाऊसाहेब वाकचौरे, प्रमोद मंडलिक , किशोर काळे, विलास भरीतकर, सुरेश गायकवाड, गोपीनाथ ताजणे, शेखर भरीतकर, उर्मिला राऊत, अलका अवसरकर, प्रतिभा सूर्यवंशी, भाऊसाहेब बाळसराफ, बाळासाहेब वडजे, राम रूद्रे, गोपीनाथ चौधरी, भाऊसाहेब चौधरी, रामदास पांडे, मच्छिंद्र चौधरी, संतोष खांबेकर, सुनिल गुजर, शुभम खर्डे, दत्तात्रय सगर, गणेश बोर्हाडे, वसंत कोल्हाळ, विशाल वाघमारे, अरूण भालेराव, सुनिल चव्हाण, एन.टी.कदम, बाळासाहेब वाकचौरे, मुकुंद जुन्नरकर, प्रकाश सासवडे, दत्ता मंडलिक, सुदाम मंडलिक, नवनाथ पन्हाळे, लहानभाऊ मंडलिक, दत्ता बंदावणे आदी मान्यवर उपस्थित होते.