इतर
कोरठण खंडोबा ला रंगणार कुस्त्यांचा आखाडा,

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
लाखो भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान,पिंपळगावरोठा ता पारनेर या राज्यस्तरीय ब वर्ग तीर्थक्षेत्रावर श्रावण पौर्णिमा(रक्षाबंधन)उत्सव गुरुवार 11 ऑगस्टला आणि कुस्त्यांचा आखाडा(हगामा उत्सव)रविवार दिनांक 14 ऑगस्टला संपन्न होणार आहेत
श्री खंडोबा भक्त श्री खंडू देवराम गुंजाळ राहणार कांदळी(वडगाव )तालुका जुन्नर यांनी ३ लाख रुपये खर्चाचा नवीन देणगी कक्ष दान रुपात देवस्थानला अर्पण केला असून या देणगी कक्षाचे उद्घाटन श्रावण पौर्णिमा उत्सवात सकाळी 11 वाजता होईल.२ वर्षानंतर कुस्त्यांचा आखाडा देवस्थान जवळ भरणार असल्याने कुस्तीप्रेमी भाविक भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे,श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्टला सकाळी देवाची मंगस्नान,पूजा,साज शृंगार,अभिषेक,महाआरती होऊन भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले होईल
सकाळी 10 वा श्री खंडोबा उत्सव मूर्तीची पालखी प्रदक्षिणा मिरवणूक वाजंत्री,ताफा व ढोल,लेझीमच्या तालावर मंदिरातून प्रस्थान होईल. रक्षाबंधनानिमित्त सर्व महिला वर्गाकडून श्री खंडोबाला भक्तीने राखी अर्पण करण्यात येते.नंतर घरोघर राखी बंधनांचा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो.पालखी विसावा घेऊन निघाल्यावर पारंपारिक लंगर तोडण्याचा विधी संपन्न होईल हा लंगर तोडण्याचा विधी सर्वांचे लक्ष वेधून घेतो पालखी संवाद्य मिरवणुकीने मंदिरासमोर फरसावर आल्यावर पौर्णिमा महाप्रसाद अन्नदाते व पुजारी पालखीला नैवेद्य अर्पण करतात नंतर पालखी मंदिरात विराजमान होईल.
श्रावण पौर्णिमा उत्सव व हंगामा उत्सव महाप्रसादाचे अन्नदाते ग्रामस्थ औरंगपूर तालुका शिरूर,सुरेश कोते. पुणे,वैभव पोपट मुळे, मांजरवाडी,श्रीमती सावित्राबाई पंढरीनाथ आग्रे नांदूरपठार आणि श्री खंडोबा भक्त यांच्या वतीने महाप्रसाद वाटप होईल.
देवस्थानचा हगामा उत्सव रविवार 14 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 5 वा दरम्यान संपन्न होईल नावे कुस्त्यांसाठी देणगीदारांनी आपली इनामाची रक्कम अगोदर देवस्थान कार्यालयात जमा करावी या आखाड्यात निकाली कुस्त्यांची परंपरा आहे तरी सर्व पहिलवानांनी कुस्त्या निकाली कराव्यात हगामा उत्सवाला आलेल्या सर्वांनी देवस्थान मध्ये महाप्रसाद लाभ घ्यावा,असे निवेदन देवस्थान तर्फे अध्यक्ष ऍड पांडुरंग गायकवाड,उपाध्यक्ष गंगाराम बेलकर,सचिव महेंद्र नरड,सहसचिव मनीषा जगदाळे,खजिनदार हनुमंत सुपेकर,विश्वस्त अश्विनी थोरात,चंद्रभान ठुबे,किसन धुमाळ,बन्सी ढोमे ,दिलीप घोडके,मोहन घनदाट,किसन मुंढे,साहेबा गुंजाळ, देविदास क्षिरसागर,अमर गुंजाळ यांनी केले आहे.