मवेशी येथील एकलव्य रेसिडेन्सीयल स्कूलला जिल्हास्तरीय स्वच्छ शाळा पुरस्कार..!

अकोल प्रतिनिधी
नगर जिल्ह्य़ातील सह्याद्रीच्या कुशीतील आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या मार्गाने आत्मसन्मान जपन्यासाठी विकासीत करण्यात आलेल्या
शैक्षणिक संकुल मवेशी ता अकोले येथील एकलव्य रेसिडेन्सीयल पब्लिक स्कूल मवेशी सीबीएसई पँटर्न या शाळेस शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्यातर्फे 2021-2022 या शैक्षणिक वर्षांतील जिल्हास्तरीय “स्वच्छ शाळा पुरस्कार” जाहीर झाला आहे.
सदर अभियानांतर्गत स्वयंमूल्यमापन अहवाल व जिल्हा स्तरावरील शिक्षण विस्तार अधिकार जिल्हा समितीद्वारा पडताळणी करून शाळेला फाइव्हस्टार प्राप्त झाला असून जिल्हास्तरीय स्वच्छ शाळा.
पुरस्कार शाळेला प्राप्त झाला सदर पडताळणी समितीव्दारा सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, स्वच्छता, विद्यार्थ्याचे सामाजिक मानसिक वर्तन बदल,कोविड- 19 दक्षता व प्रतिसाद, व शालेय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व्यवस्था या बाबींचा समावेश असल्याने शाळेने सर्व मानांकन पूर्ण करून जिल्हास्तरीय स्वच्छ शाळा पुरस्कारप्राप्त केला आहे.
याकामी शैक्षणिक संकुलातील मवेशी येथील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक,अधिक्षक व.शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे एकलव्यचे प्राचार्य डॉ.देवीदास राजगिरे यांनी आभार व्यक्त केले
.स्वच्छता,आरोग्य, अभ्यास या त्रिसुत्रीव्दारे गेले एकवीस वर्षापासून आश्रमशाळा विद्यार्थी विकासाचा ध्यास व वसा घेऊन प्राचार्य डॉ.देवीदास राजगिरे अविरत कार्यरत असून या पूर्वीदेखील शाळेस अनेक सन्मान प्राप्त झाले असल्याचे डॉ.राजगिरे यांनी सांगितले.
स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळाल्याबद्दल आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, अपर आयुक्त संदिप गोलाईत, प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी, शरद कोंडार व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विद्यालयाचे कौतुक केले आहे.