सोनई-लांडेवाडी रस्त्यावरील तो खड्डा अखेर बुजवला!

सोनई–[ विजय खंडागळे] गेल्या तीन वर्षापुर्वी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्या पुढाकारातुन ग्रामविकास खात्याच्या मार्फत सोनई -लांडेवाडी रस्त्याच्या मधून पाच फुटहुन अधिक खड्डा खोदला होता,ही
बातमी येताच आज खडी – मुरूम टाकून बुजवण्यात आला आहे.
काम अतिशय मजबुत व टिकाऊ काम झाले होते.पण लांडेवाडीरोड वरील सुजाता इंटरनॅशनल शाळे समोर सांडपाण्याच्या लाईन साठी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रस्ता खोदला होता,रस्ता खोदला असता तो पुर्ववत बुजण्याची जबाबदारी संबधित खोदकाम करणाऱ्या व्यक्तीची असते.पण लांडेवाडी रोडच्या सुजाता इंटरनॅशनल शाळेसमोर रस्ता खोदला असता संबधित खोदकाम करणार्या व्यक्तीने खाजगी कामासाठी सरकारी रस्ता
जेसीबीने खोदला पण परत तो बुजून टाकला नव्हता,साधा लांब मुरूम सुदधा टाकला नव्हता,.यामुळे या ठिकाणी जीवघेणी अपघात होण्याची दाट शक्यता होती, दरम्यान सोनई लांडेवाडी परिसरातील नागरिकानी याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती, साधा सार्वजनिक प्रश्न असल्याने कुणी तक्रार करण्यास पुढे येत नव्हता,परंतु काल दि.२० रोजी या संबंधात बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.याची दखल घेऊन तातडीने खोदलेला खड्डा बुजवण्यात आला आहे.याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्तावर मोठं मोठे खड्डे पडून पाण्याचे डबके साचले असून वाहने सोडाच पायी चालणे अवघड बनले आहे, या बाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.काही ठिकाणी दुचाकी खड्डात घसरून अपघात होत आहेत.राञी अपराञी गाडया चालवणे सुदधा या लांडेवाडी रस्तावर जाणे अवघड झाले आहे. तसेच परिसरातील नागरिकांना पायी चालणे सुदधा जिकरीचे झाले आहे.यामुळे परिसरातील नागरिक लवकरच खराब झालेल्या रस्त्याची तक्रार करून चौकशीची मागणी सार्वजनिक बांधकाम खाते क डे करणार आहे .