सर्वोदय विदयालय राजूर व आश्रमशाळा शेणितला स्वच्छ विदयालय पुरस्कार स्पर्धांत फाईव्ह स्टार मानांकन.

अकोले /प्रतिनिधी–
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे वतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वी.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर तसेच डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा शेणित या शाळेची जिल्हा स्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
निवड पथकाने मैदानाची स्वच्छता, शुद्ध पाण्याची व्यवस्था, अपंग विदयार्थी सोयी सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक विभाग, स्टाफरूम, कार्यालय, स्वच्छतागृहे, इमारत, वर्गखोल्या आदी सुविधांची बारकाईने पाहणी केली व समाधान व्यक्त केले होते. सर्वोदय विदयालयातील सर्व सोयी सुविधा त्यांची सुयोग्य व्यवस्था, योग्य मांडणी, स्वच्छता त्याचप्रमाणे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पेयजल व्यवस्थेसाठी फाईव्ह स्टार मांनांकन मिळाले आहे.
अशिष येरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचे हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात जिल्ह्यातील ३८ शाळांना प्रमाणपत्र देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
सदर स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ५२८९ शाळांनी सहभाग नोंदवून स्वयंमूल्यमापन केले होते. त्यापैकी ३६३ शाळांचे जिल्हास्तरावरून शिक्षण विस्तार अधिकारी तथा मूल्यांकनकर्ता यांचे मार्फत पडताळणी करुन जिल्हास्तरावर ३८ शाळांची निवड करण्यात आली. त्यात अकोले तालुक्यातून आदिवासी दुर्गम भागातील गुरूवर्य रा.वी.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर तसेच डॉ.राजेंद्र प्रसाद प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा शेणित या शाळांची जिल्ह्यास्तरावर सदर पुरस्कारासाठी निवड झाली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्व नियमितपणे पटवून दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांचे पोषण, आरोग्य, क्रीडा इत्यादी बाबींकडे सातत्याने काळजी पूर्वक लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांना नियमित पिण्यायोग्य पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शाळेत जलशुद्धीकरण संयंत्र बसविण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी त्याचा लाभ घेतात.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग उत्तम व निरोगी राहण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना आहारात नियमितपणे फळे, पालेभाज्या, फळभाज्या दिली जातात. खाद्य पदार्थ संरक्षित करण्यासाठी शित कपाटे, मुला- मुलींसाठी स्वतंत्र व अद्ययावत स्नान गृह व स्वच्छता गृह ,खेळ साहित्य, प्रशस्त क्रीडांगण शाळेसाठी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना बालवयातच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी प्रशस्त संकणक प्रयोगशाळा सत्यनिकेतन संस्थेने उपलब्ध करुन दिलेली आहे. सत्यनिकेतन संस्थेच्या या शाळांची जिल्ह्यास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल व पंचतारांकित मानांकन मिळाले बद्दल विदयालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे,उपप्राचार्य बादशहा ताजणे, पर्यवेक्षक मधुकर मोखरे तसेच शेणित आश्रम शाळेतील प्राथमिक मुख्याध्यापक शामराव साबळे, माध्यमिक मुख्याध्यापक संजयकुमार शिंदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, विदयार्थी आदींचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, सचिव टी. एन. कानवडे , संचालक मिलिंदशेठ उमराणी,अशोक मिस्री, प्रकाश टाकळकर,विजय पवार,सर्व संचालक,विभागीय अधिकारी प्रकाश महाले आदींनी अभिनंदन केले.तसेच भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.