असंघीटत कामगारांच्या न्याय हक्कां साठी भारतीय मजदूर संघ उतरणार -अनिल ढूमणे
पुणे- असंघीटत कामगारांच्या न्याय हक्कांच्या करिता भारतीय मजदूर संघ उतरणार रस्ता वर असल्याचे अध्यक्ष भारतीय मजदूर संघघाचे अध्यक्ष अनिल ढूमणे यांनी सांगितलेअनिल ढू मने
भांमसंघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जाहीर मेळाव्यात अनिल ढुमणे अध्यक्ष भारतीय मजदूर संघ यांनी ही घोषणा केली
संसदेच्या दोन्ही सभागृहात नुकतेच 44 कामगार कायद्यांचे 4 कोड बिल मध्ये रूपांतर केले आहे. या मधील वेज कोड व सोशल सिक्युरिटी कोड चे भामसंघाने स्वागत केले असुन या मुळे रोजगारात वाढ होईल,अशी अपेक्षा आहे तसेच असंघीटत कामगारांची नोंदणी, कल्याणकारी योजना, ई श्रम पोर्टल व्दारे नोंदणी, नुतनीकरण ई लाभ कामगारांना होणार आहेत. परंतु सरकार च्या आय. आर. कोड व हेल्थ अॅड सेफ्टी कोड मुळे भविष्यात कायम कामगारांच्या रोजगार, सेवा शर्ती, नोकरी मध्ये सुरक्षा, औद्योगिक कलह पध्दतीं, न्यायीय निवडा पध्दतींमध्ये मोठ्या कामगार व कामगार संघटने समोर मोठ्या प्रमाणात आव्हान उभे राहणार आहे , त्यामुळे आय आर कोड व हेल्थ अॅड सेफ्टी कोड मध्ये कामगारांच्या हिताचे सुधारणा भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या आहेत जर सरकारने भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या बदला प्रमाणे सुधारणा न केल्यास 21 डिसेंबर 2022 रोजी मुंबई येथे राज्यव्यापी लाॅग मार्च काढणार असुन या मध्ये हजारो कामगारांनी एकजुटीने सहभागी होवून श्रमिकांची , कष्टकरांची ताकद दाखवून द्यावी असे आवहान भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे यांनी केले
अनिल ढू मने