शिक्षणचा उपयोग गावच्या विकासासाठी करा -शिवाजीराव काकडे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शिक्षणाचा उपयोग युवकांनी फक्त नोकरी मिळविण्यापुरताच न ठेवता आपल्या बरोबरच आपले गाव प्रगत करण्यासाठी ठेवावा तरच गावचा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड.शिवाजीराव काकडे यांनी अंतरवाली बु येथे केले.
बुधवार दि(०९) रोजी आबासाहेब काकडे कला व विज्ञान महाविद्यालय बोधेगाव व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरवाली बु येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.के.फसले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मण बिटाळ, सरपंच गणेश कापसे, भारतराव कापसे, रामदास आव्हाड, रामकिसन सांगळे, अंबादास सांगळे, पै.पिनुभाऊ कापसे, भीमराव खंडागळे, अशोक खाडे, अशोक पठाडे, सिताराम सुरोसे, उपसरपंच जालिंदर कापसे, नवनाथ बिटाळ, विठ्ठल कापसे, सिताराम सांगळे, बापूसाहेब खताळ, कुंडलिक पालवे, पोपट पालवे, शिवनाथ खाडे, रविंद्र उगले व राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड. काकडे म्हणाले की, माणसाने चांगले कर्म केले की त्याचे चांगलेच होते. युवक ही आपल्या गावाची, देशाची ताकद आहे. आज युवकच समाज परिवर्तन करू शकतात, गावचा विकास करू शकतात. तसेच मरणानंतरही माणसास जगता येते ते आपल्या चांगल्या कामाच्या रूपाने म्हणून युवकांनी समाज हित पहावे असेही ते बोलताना म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनील आढाव यांनी केले तर आभार सुरवेंद्र पडोळे यांनी मानले.