
नगर: नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत असलेल्या विळदघाट येथील कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या कु. चौधरी धनश्री बजरंग, गायकवाड प्रज्ञा सुंदर, कदम अक्षदा बबन,करंडे पूजा दत्तात्रय,शेळके सरीता संजय यांनी शेतकऱ्यांना शून्य ऊर्जेवर आधारित शितकक्षाचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले.
शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणातील भाजीपाला जास्त काळ टिकून राहावा यासाठी , घरच्या घरीच , मोठ्या प्रमाणात भाजीपाला टिकवण्यासाठी शून्य ऊर्जा शीतगृहाचा वापर केला जाऊ शकतो.
कृशिकण्यांनी शीतगृह बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखऊन शेतकऱ्यांना मारगदर्शन केले.
या उपक्रमात त्यांना प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे, उपप्राचार्य डॉ. एस बी राऊत, कार्यक्रम समनव्यक प्रा. के. एस. दांगडे, प्रा. पी सी ठोंबरे, प्रा. ए बी भोसले यांनी मार्गद्शन केले.