असाही प्रमाणिकपणा !

दुकानात विसरलेले चार तोळे सोने परत केले
दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील माका येथील विठाई
औषधी दुकानचे मालक संदिप अंबादास म्हस्के यांनी पाचुंदे येथील महिला मंगलबाई पोपट घोरपडे यांची विसरुन राहीलेली बॅग,त्यामधील चार तोळे सोने व पंचविस हजार रु. रोख रक्कम असे जवळपास सव्वा दोन लाखाचा ऐवज प्रामाणिकपणे परत केला
या बाबतची अधिक माहिती अशी की मंगल पोपट घोरपडे या महिलेने काल सकाळी 11:30 सुमारास पतसंस्थेतुन दागिने सोडवून आणले होते घरी जाताना त्यांनी माका येथील विठाई मेडिकल दुकानातून काही औषधे खरेदी केले हे खरेदी करताना तिच्या हातातील पिशवी चुकून विठाई मेडिकल या दुकानात विसरून राहीली,मेडिकल दुकांनचे मालक संदीप म्हस्के यांची पत्नी वृषाली संदीप म्हस्के यांना दुपारनंतर दुकान झटकत असता, बाहेरच्या बाजुने कुणाची तरी पिशवी विसरून राहिल्या चे लक्षात आले ही बाब त्यानी नंतर पती संदीप व सासरे अंबादास रामभाऊ म्हस्के यांचे लक्षात आणून दिली पिशवी तील कागदपत्रांच्या ओळखीने म्हस्के यांनी आज सकाळी घोरपडे कुटुंबियांशी संपर्क करुन दोन्ही गावातील ग्रामस्थांच्या उपस्थित,प्रामाणीकपणा दाखवुन ती पिशवी त्यांना परत केली
परिसरातुन म्हस्के यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले जात आहे.
याप्रसंगी माका येथील ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते
पाचुंदे सेवा सहकारी सोसायटी चेअरमन माणीक होंडे व तंटामुक्ती अध्यक्ष नारायण वाघमोडे स्वरुपचंद गायकवाड व मल्हारी
आखाडे यांनी मेडिकल दुकान मालकाचे
कौतुक करून आभार मानले