गटारी च्या रात्री अवैध दारु साठा पकडला , राजूर पोलिसांची कारवाई

राजूर /प्रतिनिधी
गटारी आमवश्याच्या दिवशी राजूर पोलिसांनी रात्री अवैध दारूसाठा दारू साठा जप्त केला
दि. 28/07/2022 रोजी रात्री 08/00 वा सुमारास कोल्हार घोटी रोडने एक इसम चारचाकी वाहनातून दारुचे बॉक्स घेवुन जाणार आहे बाबत माहीती पोलिसांना मिळाली.
या वाहनावर कारवाई करण्याकरिता पोलीस स्टाप यांना कोल्हार घोटी रोड वर केळुगंण फाटा येथे नाकाबंदी करण्यास सांगितले तेथे नाकाबंदी करत असताना एक व्यक्ती मारुती कंपनीची अल्टो गाडी क्रमांक MH04 CM 8666 घेवून समोरुन आला. सदर गाडी थांबवून तपासणी केली असता त्यांमध्ये खालील प्रमाणे दारुचा मुद्देमाल मिळुन आला. 16,800/-रु कि.च्या बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारुच्या 240 सिलंबंद बाटल्या प्रत्येकी 180 मिली,1,50,000 /- रु. कि. मारुती कंपनीची अल्टो गाडी क्रमांक MH04CM8699 जु.वा. कि.अ.
एकुण-1.66.800 /- रु. कि. नमुद इसमास विचारपुस केली असता त्याचे नाव किसन सोना बांडे, वय-45 वर्ष, रा-खडकी खु. , ता. अकोले., जि.अहमदनगर सांगून नमुद मुद्देमाल हा विनापरवाना विक्री करीता घेवुन जात असल्याचे सांगितले
त्यास वाहनासह ताब्यात घेऊन त्याचेवर पो कॉ 2584 अशोक गाढे यांच्या फिर्यादीवरून राजुर पोस्टे गु.र.नं 162/2022 मु.पो. ऑक्ट कलम 65(अ), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास म.पोना.वाडेकर करित आहे
सदरची कारवाई मा. श्री मनोज पाटील पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर मा. श्री राहुल मदने उपविभागिय पोलीस अधिकारी, संगमनेर याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, नरेद्र साबळे, पोहेकॉ/1604 प्रकाश भैलुमे. पो हवा/ विजय मुंढे, पो कॉ/2584 अशोक गाढे, पो कॉ/ 2643 अशोक काळे, पोकॉ.आकाश पवार, चापोशी/ राकेश मुलाने यांनी केली. अवैध दारु विक्री करणारे व्यक्ती, ठिकाणे माहीती असल्यास राजुर पोलीस स्टेशनशी संपर्क करावा आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.