मेट्रो सिटी न्यूज

संरक्षण , सरकारी ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणार.


पुणे दि ३१

आज दि.29|7|2022 रोजी आयुध निर्माण देहुरोड ( ordinaans factory Dahur oad ) आस्थापनेतील कंत्राटी कामगारांनी नुकतीच “ठेकेदार कामगार संघ” च्या संघटनेचे नामफलकाचे उद्घाटन संपन्न झाले.

याप्रसंगी देहूरोड छावनी बोर्डचे प्रशासन श्री. कैलास पानसरे भा. म संघाचे राष्ट्रीय ऊद्योग प्रभारी श्री. अण्णा धुमाळ, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे , अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे कार्याध्यक्ष उमेश विस्वाद , भा. म. संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.अर्जुन चव्हाण भा. म. संघ ,राष्ट्रीय मिडिया प्रभारी श्री.निलेश खेडेकर भा.म. संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते श्री. अशोक थोरात यांनी सुत्रसंचालन केले मान्यवरचे स्वागत आस्थापनेतील ठेकेदार कामगारांच्या वतीने करण्यात आले सर्व मान्यवरांच्या हस्ते नारळ वाठवुन आणि रिबीन कापून नोटीस बोर्डाचे उद्धाटन करण्यात आले.

संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी प्रस्तावना केली या वेळी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आंदोलनेच्या बरोबर ऊभे रहावे, देशातील विविध राज्यात चालू असलेल्या कंत्राटी कामगार महासंघाचे आंदोलने, विविध योजनांची ची माहिती दिली. व येणार आवाहनांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहावे असे आवहान केले आहे. श्री.अर्जुन चव्हाण यांनी मार्गदर्शन केले भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा कंत्राटी कामगारांच्या सोबत ऊभे राहील असे नमुद केले आहे.

श्री आण्णा धुमाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले असंघटित कामगारांसाठी भारतीय मजदूर संघाच्या विविध मागण्यांची माहिती दिली तसेच देहूरोड मध्ये सध्या चालू असलेल्या ठेकेदार कडून जी पिळवणूक करत आहेत त्यांना इशारा दिला जर हे प्रकार थांबले नाहीत तर केंद्रीय पातळीवर हा विषय घेऊन वेळ पडली तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करु. राजकीय पक्ष जर ट्रेड युनियन च्या नावाने सुरू केलेले दुकान लवकर बंद करावे कामगारांच्या हक्क मिळवण्यासाठी पर्यंत करावे त्याकाळी आम्ही त्यांना मदत करू पण जर राजकीय पक्ष म्हणून आपण कामगारांना त्रास देण्याचा प्रयत्न जर केला भारतीय मजदूर संघ सहन करणार नाही असा इशाराही श्री धुमाळ यांनी दिला. ठेकेदार कामगार संघाचे श्री. गणेश भेगडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले बाबूअण्णा यांनी सर्वाना मिठाई वाटून शुभेच्छा दिल्या देहूरोड मधील इतर सर्व संघटनेच्या पदाधिकारी आणि जवळपास 200 250 ठेकेदार कामगार उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button