आदर्श गाव मांजरसुंबा येथे कृषि कन्यां नी केले कृषी मेळाव्याचे आयोजन

एकात्मिक शेती पद्धत आणि मधुमक्षिका
पालन यावर केले मार्गदर्शन
नगर प्रतिनिधी
नगर तालुक्यातील आदर्शगाव गड मांजरसुंबा येथे कृषी ग्रामीण (कृषी) जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषीकन्या चौधरी धनश्री , गायकवाड प्रज्ञा , कदम अक्षदा , करंडे पूजा , शेळके सरिता , भगत मोनिका , भोर निकिता , होले प्रांजली , घोगरे पूनम , गिरवले प्रेरणा , जाधव वैष्णवी यांनी कृषी मेळाव्याचे आयोजन केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी संलग्नित कृषी महाविद्यालय विळदघाट येथे या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत . कृषी महाविद्यालय विळदघाट चे प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे सर यांनी एकात्मिक शेती पद्धत आणि मधुमक्षिका पालन यासंबंधी माहिती दिली . कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले . कार्यक्रम अधिकारी प्रा. पूनम ठोंबरे , प्रा. अर्जुन भोसले , प्रा. सुवर्णा मानकर , प्रा. डी. एम. नलवडे , प्रा. के. बी.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कृषी कन्यांनी कृषी मेळावा आयोजित केला . त्याचबरोबर मांजरसुंबा गावचे सरपंच सौ. मंगलताई कदम व उपसरपंच श्री. जालिंदर कदम , डोंगरगण गावच्या सरपंच सौ. वैशालीताई मते यांनी कृषी कन्या चे कौतुक व स्वागत केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी कन्या पूजा करंडे व अक्षदा कदम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन कृषिदुत अक्षय गिर्हे व कृषी कन्या चौधरी धनश्री यांनी केले .
यामध्ये सेंद्रिय शेती , हवामान अंदाज व जेरिनियम शेती यासंबंधीत चर्चा करण्यात आली.
मांजरसुंबा व डोंगरगण गावचे सरपंच , उपसरपंच तसेच सोसायटी चे सदस्य आणि शेतकरी यांच्या समवेत हा कृषी मेळावा मांजरसुंबा येथे पार पडला .