इतर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खुल्या जागेत सांडपाण्याचा प्रादुर्भाव

दत्ता ठुबे

पारनेर दि.१२ प्रतिनिधी
पारनेर शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील व गट क्रमांक १३ मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकच्या ०.१६ आर खुल्या जागेत आनंद नगर वसाहतीचे दोन चेंबर ब्लॉक झाल्याने सांडपाणी चेंबरच्या वरून वाहत आहे. हे सांडपाणी खुल्या जागेत वाहून जात आहे. त्या ठिकाणी सांडपाणी साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या अस्वचतेची तातडीने बंदोबस्त करून खुली जागा साफ करून देण्यात यावी. या करीता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष राजेंद्र करंदीकर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट) तालुकाध्यक्ष किरण सोनवणे यांचे नेतृत्वाखाली प्रशासन अधिकारी माधव गाजरे यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, की पारनेर गट नंबर १३  मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ०.१६ आर खुल्या जागेत प्रभाग क्रमांक दहा मधील आनंदनगर वसाहतीचे सांडपाणी सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे स्मारकाच्या खुल्या मैदानात घाणीचे साम्राज्य झाले आहे. सदर मैदानात काही वर्षांपूर्वी बुधवार दि. १०/९/२०१७ रोजी  बुद्ध पौर्णिमे दिवशी बौद्धगयेच्या पवित्र बोधिवृक्षाचा बीजारोपा पासून तयार केलेल्या रोप लावण्यात आलेला आहे. सदर रोपाचे आता बोधिवृक्षाचे रूपांतर झाले आहे. सदर सांडपाण्यामुळे मैदानात शेजारील राहुल नगर वसाहती मधील नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच बोधिवृक्षचा  देखील अपमान होत आहे . या वाहत्या घाण सांडपाण्याचा नगर पंचायत संबधित विभागाने ताबडतोब बंदोबस्त करावा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची जागा स्वच्छ करून मिळावी अन्यथा नगरपंचायत विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल .या निवेदनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संघर्ष समिती अध्यक्ष राजेंद्र करंदीकर ,विकास कार्यकारी सेवा सोसायटी संचालक शरद नगरे ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तालुकाध्यक्ष किरण सोनवणे ,जनार्दन सोनवणे ,सुभाष गायकवाड ,प्रदीप मोरे ,आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button