हसनापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

शेवगाव -तालुक्यातील हसनापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक दोन ऑगस्ट पासून या सप्ताहाची सुरुवात झाली असून मंगळवार दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी या सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे
सप्ताह काळात पहाटे चार ते सहा भजन सकाळी सात ते आठ विष्णुसहस्रनाम सकाळी आठ ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा गाथा भजन दुपारी दोन ते चार रामायण दुपारी चार ते पाच प्रवचन पाच ते सहा हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन व नंतर हरिजागर असा दैनिक कार्यक्रम पार पडणार आहे
या कार्यक्रमात ह.भ. प. माणिक महाराज ढाकणे ह.भ.प. जगन्नाथ महाराज वेगणे ,ह.भ.प.दादा महाराज शास्त्री,ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज बटुळे शास्त्री, ह.भ. प विलास महाराज ढाकणे, ह.भ. प नरोडे महाराज ,ह.भ. प. सुधाकर महाराज ढाकणे ह.भ. प त्रिविक्रम महाराज शास्त्री, ह.भ. प शिवाजी महाराज फटाले ,ह.भ. प रामगिरी महाराज , ह.भ. प. चंद्रकांत महाराज कोळगाव ह.भ. प.भगवान महाराज शास्त्री यांचे कीर्तन व प्रवचनाचा कार्यक्रम पार पडणार आहे
मंगळवार दिनांक 9/8/2022 रोजी सकाळी आठ ते दहा वाजता हरिभक्त परायण आदिनाथ महाराज शास्त्री (श्री क्षेत्र तारकेश्वर गड) यांचे काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसादाच्या पंगतिने कार्यक्रमाची सांगता होईल या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त हसनापूर ग्रामस्थांनी केली आहे