दारूमुळे विधवा झालेल्या महिलांचे १५ ऑगस्टला अकोले पोलीस स्टेशनसमोर उपोषण!

अकोले प्रतिनिधी
अकोल्याच्या शाहूनगरमध्ये अवैध दारूमुळे आतापर्यंत २३ मृत्यू झालेत.अनेकदा तक्रारी करूनही ४०० कुटुंबाच्या या छोट्या वस्तीत अजूनही ७ ठिकाणी दारू विकली जाते.अनेक तरुण त्यामुळे मृत्यूच्या दारात आहे.
तेव्हा ज्या महिलांच्या पतीचे मृत्यू दारूने झाले त्यांचे उपोषण १५ ऑगस्ट पासून पोलीस स्टेशनसमोर करण्यात येणार आहे. त्याचे निवेदन पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक, उत्पादनशुल्क आयुक्त यांना निवेदन पाठवून संगमनेर येथील उत्पादनशुल्क अधिकारी व अकोले पोलीस निरीक्षक यांच्यावरही या दारूविक्रीची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात दारूविक्री करणारे विक्रेत्यांना अटक करून तालुक्यातून तडीपार करावे,
पोलीस निरीक्षक यांच्याकडे अनेकदा तक्रार केली,
इंदोरी फाटा,विरगाव फाटा येथील हॉटेल व अकोल्यातील ज्या देशी दारू दुकानातून शाहूनगरमध्ये दारू येते त्यांचे परवाना रद्द करावे व रोज गुंजाळवाडी संगमनेरवरून अकोल्यात येणाऱ्या दारूच्या गाड्या पकडून दलालांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
कोतुळ येथे बसस्थानक परिसरात व दत्तमंदिर इंदिरानगर परिरारात मोठ्या प्रमाणात अवैध देशी विदेशी दारू विकली जाते या ठिकाणी अनेक वेळा तक्रारी करूनही पोलीस व उत्पादन शुल्कविभागचे अधिकारी कोणतीही दखल घेत नाही केवळ कारवाईचा देखावा केला जातो परंतु दारूविक्री सुरूच राहते अवैध दारूविक्रीत बनावट दारू ग्राहकांचा माथी मारली जाते यात अनेकांच्या लिव्हर किडन्या खराब झाल्या आहेत कोतुळ ग्रामपंचायटीनेही याबाबत पत्रव्यवहार केला आहे मात्र या पत्राला केराची टोपली दाखविल्याने संताप व्यक्त होत आहे
आज हेरंब कुलकर्णी ऍड वसंत मनकर, शांताराम गजे, भाऊसाहेब मंडलिक,बबनराव तिकांडे, प्रमोद मंडलिक यांनी हे निवेदन पोलीस निरीक्षक अकोले यांना देऊन चर्चा केली