गणेशवाडी रायतळे येथील जिल्हा परिषद शाळा तीन वर्षा पासून भरते मंदीरात!

पारनेर तालुक्यात शाळा मंदीरामध्ये भरतात हे दुर्दैव
–अविनाश पवार
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील गणेशवाडी रायतळे येथील जिल्हा परिषद शाळा चक्क तीन वर्षा पासून मंदीरामध्ये भरत आहे विशेष म्हणजे शिक्षण विभागाच्या अधिकारी वर्गाला याची माहिती असतानाही त्याचे त्यांना गांभीर्य नाही . आज पावसाळ्यात विद्यार्थी चक्क मंदीरामध्ये शिक्षणाचे धडे घेत आहेत नवनिर्वाचित आमदार ज्यांचे देशात नाव गाजते आहे असे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी सौ.राणीताई निलेश लंके सुपा जिल्हा परिषद गटांमध्ये दहा वर्षे जिल्हा परिषद सदस्य आहे
.ग्रामस्थ आणि शिक्षकांशी चर्चा केल्यावर खेदजनक बाब म्हणजे या शाळेचं भुमीपुजन सुद्धा तीन वर्षात दोन वेळा आमदार निलेश लंके यांनी केले आहे असे ग्रामस्थ बोलतात मग प्रश्न असा येतो की भुमीपुजन करुन सुद्धा शाळेचं बाधकाम होणार नसेल तर खुप मोठं दुर्दैव आहे

शाळेमध्ये राजकारण विरहित काम करायला हवे गट तटाचे राजकारण सर्व महाराष्ट्रात चालु आहे पण शाळा हे ज्ञान मंदिर आहे, त्यांच पाविञ्य राखन गरजेचं आहे.गावच्या राजकारणात जर छोटी छोटी मुले शाळेवाचुन वेठीस धरले जात असतील तर ही मोठी शोकांतिका आहे .महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर ह्या गोष्टी चा जाहिर निषेध करत आहे ,जर १५दिवसात जिल्हा परिषद प्रशासनाने व शिक्षण विभागाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर च्या वतीने पालक,आणि विद्यार्थीसह जिल्हा परिषद अहमदनगर येथे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद अहमदनगर याची राहील असा इशारा मनसे पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी दिला आहे
सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी यांची भेट घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले .यावेळी सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के यांनी विद्यार्थीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सांगितले. यावेळी शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष,व पालक शिक्षक यांनी पण खुप वेळा कागदोपत्री पाठपुरावा केला पण यश न आल्याने नाराजी व्यक्त केली.यावेळी महाराष्ट्र सैनिक ओकांर भाऊ काळे आणि गणेशवाडी येथील विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
————