शिक्षण व आरोग्य

केळी कोतूळ आश्रम शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा , माजी विद्यार्थ्यांची शाळेला 1 लाख 11 हजाराची देणगी

कोतूळ प्रतिनिधी
शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा केळी कोतूळ या शाळेचा सुवर्ण महोत्सव व माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला यावेळी माजी विद्यार्थ्यांतर्फे शाळेला एक लाख 11 हजार रुपयाची देणगी दिली

उच्चशिक्षित व सुसंस्कारित अनेक पिढ्या. या शाळेने तयार केल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष बी के घोडे यांनी केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी गटशिक्षणाधिकारी मारुती लांघी हे उपस्थित होते
यावेळी शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मूळ शाळा भरत असलेल्या जुन्या घरांचे व मंदिराचे पूजन करण्यात आले त्याचप्रमाणे सर्व माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी व सध्या सातारा येथे शिक्षण विस्ताराधिकारी पदावर असणारे श्री साईनाथ वाळेकर यांनी केले प्रस्ताविका मध्ये त्यांनी शाळेचे व शिक्षकांचे आमचे आयुष्य घडवण्यात मोठे योगदान असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी करियर गायडन्स ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, नीट ,इंजीनियरिंग व सीईटी परीक्षेचे मार्गदर्शन माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात येईल असेही सांगितले

याप्रसंगी या शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर संजय लोहोकरे यांनी लिहिलेल्या आदिवासींच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

उपस्थित सर्व माझी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार सन्मान चिन्ह शाल व बुके देऊन करण्यात आला .याप्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

माजी प्राचार्य आबासाहेब देशमुख माजी मुख्याध्यापक सुरेश जोशी आर एस भोईर श्री खेडकर ,श्री झोपाळे, आदींनी आपली मनोगते व्यक्त केली

शाळेला यावेळी एक लाख 11 हजार रुपयाची देणगी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आली तसेच एक एलईडी टीव्ही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भेट देण्यात आला

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री लक्ष्मण घोटकर ,दशरथ धिदळे, सुदाम जोशी, साईनाथ वाळेकर ,मधुकर वायळ, भगवंता दाभाडे, दत्तात्रय कचरे, भास्कर गोडे, रामदास गोडे ,संतोष गोडे ,नवनाथ वैराळ ,बाळासाहेब वायळ , प्रशांत गवारी, रंगनाथ , डॉ. मारुती भांडकोळी या सह अनेक माजी विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक नियोजन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लक्ष्मण घोटकर यांनी केले तर आभार संतोष गोडे यांनी मानले

सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांतर्फे शाळेत एक लाख 11 हजार रुपयाची देणगी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button