बेलापूर येथील रामदास हायस्कुल च्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप .

कै.पोपटशेठ उत्तमचंद भंडारी यांचे स्मरणार्थ
भंडारी परिवाराचा उपक्रम
अकोले प्रतीनिधी
विद्यार्थी हा नेहमी धेय्यवेडा असावा असे मत प्रसिद्ध उद्योजक योगेशशेठ भंडारी यांनी व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमीत्ताने काढलेल्या प्रभातफेरी प्रसंगी ते बोलत होते . या प्रसंगी कै.पोपट शेठ उत्तमचंद भंडारी यांचे स्मरणार्थ योगेशशेठ पोपटशेठ भंडारी ,निलेश शेठ पोपटशेठ भंडारी यांचे वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी रभाजी फापाळे , विठ्ठल महाले, प्रकाश टेलर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री काशिनाथ तळपाडे यांचे हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पारंपारिक वेशभुषा हे विशेष आकर्षण ठरले. विविध नेत्यांची वेशभुषा, तुळशी वृंदावन,लेझीम पथक,टिपरी पथक यामुळे प्रभात फेरीचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले
. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील भाऊसाहेब गंभीरे, विठठल ढूमणे, उमाजी गोंदके ,संपत बगाड, शुभांगी कर्डिले, निर्मला शिंदे, उदय भारती, निवृत्ती धिंदळे,मिना मांडे आदी सेवक उपस्थीत होते.सुत्रसंचालन संजय उकिरडे यांनी तर आभार प्रमोद आरोटे यांनी मानले