पारनेर सैनिक बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिध्द.■ संस्थापक सभासदासह सर्वांना मतदानाचा अधिकार.

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 29 मे रोजी प्रारूप यादी प्रसिध्द झाली होती. या प्रारूप मतदार यादीत 4 हजार 148 पात्र व अपात्र जवळजवळ 7 हजार सभासद मतदारांची नावे बँकेच्या शाखानिहाय प्रसिध्द करण्यात आलेली होत्या. या सभासद यादीवर दाखल हरकतींवरील सुनावणी होवून सोमवार (दि.26 जून) रोजी 10 हजार 979 सभासदाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. बँकेच्या अंतिम मतदार यादीत 10 हजार 979 मतदार असून येत्या आठ ते दहा दिवसांत सैनिक बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.प्रारूप यादी जाहीर झाल्यावर अक्रियाशील नावे मतदार यादीतून वगळणे, सर्व सभासदांना अधिकार देणे, व काहींच्या नावात बदल, अशा हरकती आल्या होत्या. मा.जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दाखल हरकतींवर सुनावणी घेत 19 जूनला सर्व सभासद पात्र असल्याचा निकाल दिला होता. त्यावर कोरडे, व्यवहारे, पुरस्कृत काही सभासद संस्थापक सभासद यांना अपात्र करण्यासाठीं उच्च न्यायालयात जाऊन याचिका दाखल केली होती परंतु, उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्यानूसार सोमवारी सहकार खात्याने बँकेच्या सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली. या आठवड्यात सहकार खाते बँकेचा निवडणूक कार्यक्रम तयार करून तो मान्यतेसाठी प्राधिकरणाकडे पाठविणार आहे. प्राधिकरणाकडून मंजूरी आल्यानंतर सहकार खाते निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी चेअरमन शिवाजी व्यवहारे यांचे सत्ताधारी मंडळ व विरोधी बाळासाहेब नरसाळे, विक्रमसिंह कळमकर यांचे परिवर्तन मंडळ पॅनल बनवण्यासाठी कामाला लागले आहेत.आण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या व जिल्ह्यातील माजी सैनिकांची अस्मिता असणार्या सैनिक बँकेत सत्ताधारी मंडळींचा पाडाव करण्यासाठी पारनेर, श्रीगोंदा, कर्जत,जामखेड येथील माजी सैनिकांनी कंबर कसली आहे .सैनिक बँकेत संस्थापक ७ हजार सभासद अपात्र व्हावेत व फक्त आपले नातेवाईक सभासदच पात्र रहावेत म्हणून सत्ताधारी मंडळाने उच्च न्यायालया पर्यंत लढाई केली मात्र आण्णा हजारे यांच्या सह सर्वांना अधिकार मिळवून देण्यासाठी बाळासाहेब नरसाळे,विनायक गोस्वामी, मारुती पोटघन, विक्रमसिहं कळमकर ,बबनराव दिघे, सुदाम कोथिंबीरें, अरुण रोहकले यांनी कायदेशीर लढाई लढत संस्थापक सभासदांना आधिकार मिळवून दिला व संस्थापक सभासद अपात्रतेसाठी विद्यमान संचालकांचा आटापिटा पुन्हा पुन्हा व्यर्थ ठरवला.
अण्णा हजारे यांनी केले निर्णयाचे स्वागत
मा.जिल्हा उपनिबधकांनी सर्व सभासद पात्र असा निर्णय दिल्यावर या निर्णयास संभाजीनगर उच्च न्यायालयात बँकेतील संचालकांचे सभासद नातेवाईकानीं संस्थापक सभासद अपात्र करण्यासाठी रिट पीटिशन दाखल केले होते .तत्पूर्वी बाळासाहेब नरसाळे यांनी जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या निर्णयास उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते.
ज्येष्ठ विधितज्ञ सतिश तळेकर अँड असोसिएटचे ॲड. प्रज्ञा तळेकर,ॲड. आवटे यांनी सभासदांची बाजू मांडली व सर्व सभासदांना हक्क मिळवून दिला. या निर्णयाचे स्वागत बँकेचे संस्थापक जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी केले. शिवाजी व्यवहारे, संजय तरटे, नामदेव काळे,शिवाजी सुकाळे यांनी गेली ७ वर्ष बँकेत भ्रष्टाचार केला असून अनेक गंभीर आर्थिक गुन्हे दाखल असुन सराईत गुन्हेगारांना बँकेतून हद्दपार करणार असल्याच्या भावना सभासदांनी व्यक्त केल्या.