
सावरगावच्या धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचा “आमदार चषक “जुन्नरने पटकावला
दादा भालेकर
टाकळी ढोकेश्वर /प्रतिनिधी
क्रिकेट असो वा खो-खो किंवा कबड्डी इतर वैयक्तिक खेळात ग्रामीण भागातील अनेक खेळाडू लपलेले असून या ग्रामीण भागातून खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले आहे.
यंदाचा धर्मवीर शंभूराजे “आमदार चषक २०२१ “चा मानकरी प्रथम बक्षिस ७१ हजार रुपयांचे जुन्नर तालुक्यातील शिवनेर बोडके नगर या संघाने पटकावले असून आमदार निलेश लंके यांच्या हस्ते त्यांना या बक्षीस वितरण करण्यात आले.तर द्वितीय बक्षिस ५१ हजार कर्जुले हर्या येथील पप्पु लांडगे, मारुती माने,राहूल माने संघ तर तृतीय बक्षिस संगमनेर तालुक्यातील साकुरी येथील स्व. आबा पाटील संघ तर चतुर्थ बक्षिस ढोबळे मळा स्पोर्टस पारगांव,आंबेगाव या संघाने पटकावले आहे.
यावेळी आमदार लंके म्हणाले की जुन्नर तालुक्यातील दोन क्रिकेट संघांना ही बक्षिसे मिळाली असून माझ्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील मावळे असून यांचा मला अभिमान असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे एका सावरगाव सारख्या ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून आयोजकांनी एक नवा आदर्श उभा केला असल्याचे आमदार लंके म्हणाले. त्यामुळे आता या स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करून या बक्षिसांमधे वाढ करावी असे आव्हान बक्षीस दात्यांना व संयोजकांना केले आहे.
नगर – कल्याण महामार्गावर असणाऱ्या सावरगाव येथील धर्मवीर शंभू राजे प्रतिष्ठानच्या वतीने २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत आमदार चषक राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती अध्यक्ष सचिन गोडसे व उपाध्यक्ष इंद्रभान माने यांनी दिली आहे. २२ डिसेंबर २६ डिसेंबर या दरम्यान या स्पर्धेचे आयोजन केले होते. या क्रिकेट स्पर्धे साठी लाखो रुपयांची बक्षिसे आयोजकांनी ठेवलेली होती. नगर-कल्याण महामार्गावर असणाऱ्या सावरगाव येथील सौरभ पेट्रोलियम प्रांगणात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत ठाणे नगर व पुणे जिल्ह्यातील अनेक संघांनी सहभाग घेतला होता.यावेळी प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक शिवाजीशेठ बेलकर, शंकरशेठ चिकणे,सुरेशशेठ ढोमे,प्रकाशशेठ गाजरे,अबुले (वयगर ग्रपु) शिवाजीराव शिर्के, राहुल झावरे, प्रशांतदादा गायकवाड,अशोकशेठ कटारीया,रविशेठ गायखे, बाळासाहेब खिलारी,ओमकार सातपुते, महेश सासवडे, भाऊशेठ चिकणे, साहेबराव गोडसे, प्रसिद्ध गाडामालक सोपान माने,बाळासाहेब गोडसे, विकीशेठ दाते, बाबाजी चौधरी चिकणे, संदीप चौधरी, विठ्ठल माने (तंटामुक्त समितीचे अध्यक्ष) पप्पू शेठ लांडगे (उद्योजक शुभम बेलेकर,दादाभाऊ चिकणे,साहेबराव चिकणे यांच्या सह क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सावरगाव चे भूमिपुत्र व बाजार समिती संचालक शिवाजी शेठ बेलकर यांनी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे एकात्तर हजार रुपयाचे बक्षीस देऊन तरुणाईला एक नव्या मार्गावर देण्याचे काम केले आहे. त्यामुळे सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रिडा क्षेत्रात सावरगावचे दानशूर कर्ण म्हणून ओळखले जाणारे शिवाजी शेठ बेलकर हे तर दानशूर कर्ण असल्याचे आमदार निलेश लंके म्हणाले. तर दुसरीकडे मुंबईत राहून आपल्या मातृभूमीची नाळ जोडलेले युवा नेतृत्व सचिन गोडसे यांनी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून तरुण व उमेदीचा क्रिकेटपटूंना व्यासपीठच उपलब्ध करून दिले असल्याचे आमदार निलेश लंके म्हणाले आहे. त्यामुळे दरवर्षी या आमदार चषकाचे आयोजन करून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आमदार लंके म्हणाले.