विखेंना मंत्रीपद निघोज मध्ये फटाके फुटले !

विखे पाटलांच्या माध्यमातून निघोज गटाच्या विकासासाठी प्रयत्नशील
सचिन पाटील वराळ
पारनेर प्रतिनिधी :
राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील ठरलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात अहमदनगर जिल्ह्याला प्रथम संधी मिळाली आहे. कॅबिनेट मंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली असून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वात पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतली.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अहमदनगर जिल्ह्यात एकच जल्लोष केला. पारनेर तालुक्यातील निघोज येथे विखे कुटुंबाचे समर्थक असलेल्या वरळ गटाने फटाक्यांची आतिषबाजी करत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कॅबिनेट मंत्री पदाच्या निवडीचे स्वागत केले.
मंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतरच निघोज मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर निघोज मध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी अनेक विखे पाटील समर्थक उपस्थित होते. संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विखे पाटील यांच्या निवडीचे जोरदार स्वागत यावेळी निघोज येथे करण्यात आले. यावेळी बोलताना सचिन पाटील म्हणाले की विखे कुटुंब हे नेहमीच निघोज भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले आहे. वराळ कुटुंबाच्या माध्यमातून निघोज परिसराचा विकास करत असताना विखे कुटुंबाने निघोज गावासाठी ही झुकते माप दिले आहे. त्यामुळे यापुढील काळात राधाकृष्ण विखे पाटलांच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून निघोज गाव व निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून मंत्री पदाच्या माध्यमातून भरीव निधी मिळून देण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न करणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद मिळाले ही खऱ्या अर्थाने विखे गटासाठी आनंदाची बातमी आहे.
यावेळी निघोज तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश लाळगे, निघोज गावचे उपसरपंच माऊली वरखडे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ, भीमा लामखडे, पोपट जगदाळे, संतोष ढवण, नवनाथ ढवण, अनिल ढवण, असलम इनामदार, निलेश घोडे, अमीर शेख, गणेश वराळ, दिनेश ठूबे, संकेत वरखडे, मोहन जगदाळे, हरेश ससाणे, ऋषी वराळ, मारुती घोरपडे, समीर ढवळे आदींसह ग्रामस्थ तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन चे पदाधिकारी विखे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.