माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नाशिक /प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.या प्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे ,उपमुख्याध्यापक रविंद्र हात्ते , पर्यवेक्षक सूर्यभान जगताप,पर्यवेक्षिका मनिषा देशपांडे ,शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, जेष्ठ शिक्षक हिरामण आहिरे,माता पालक संघ उपाध्यक्षा गायत्री लचके ,पालक शिक्षक संघ उपाध्यक्षा योगिनी सासे , पा.शि.सहसचिव अरुणा साळुंखे,सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी , माजी विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे व जेष्ठ शिक्षक हिरामण आहिरे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्याना संविधान निष्ठेबाबत शपथ दिली व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी सर्वांचे स्वागत केले.उपमुख्याध्यापक रविंद्र हात्ते यांनी सामुहिकरीत्या संविधानाचे वाचन करून घेतले. पर्यवेक्षक सूर्यभान जगताप यांनी बेटी बचाव बेटी पढाव विद्यार्थांना याबाबत विद्यार्थ्याना शपथ दिली . शालेय विद्यार्थिनी पल्लवी भामरे , ऋतुजा कांबळे, हेमांगी माळी यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले.या याप्रसंगी इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखितांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.हस्तलिखितांचे निवेदन संगिता पाटील यांनी केले.याप्रसंगी पारितोषीक समितीच्यावतीने गुणवंत विद्यार्थी तसेच शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.बक्षीस प्राप्त विद्यार्थांचे यादी वाचन मेघा तायडे यांनी केले .क्रीडा शिक्षिका मंगला मुसळे यांनी सूत्रसंचलन केले .

प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवानिमित्त संविधानाची जनजागृती व्हावी या उद्देशाने सिडको परिसरामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा ,चित्रकला ,रांगोळी , वक्तृत्व, काव्य गायन यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील क्रिडा शिक्षक कैलास पाटील , संदीप भगरे , गायत्री ठाकूर, संपदा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थांनी डंबेल्स घुंगुर काठी प्रात्यक्षिक ,तर क्रीडा शिक्षिका मंगला मुसळे, रसिका कुलकर्णी , अबोली अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतमय लेझिम प्रात्यक्षिक सादर केले. शालेय गीत मंच व विद्यार्थ्यांनी मृण्मयी घैसास, रसिका कुलकर्णी, अबोली अकोलकर, सुनील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान अभंग, देशभक्तीपर गीत सादर केले.केशव बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय सुरक्षा दलाने संचलन सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शालेय पदाधिकारी,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.विद्यालयात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे उपस्थित पालक, माजी विद्यार्थी यांनी कौतुक केले.