शनिशिंगणापूरात तिरंगा रॅली

सोनई–प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी निमित्ताने शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर माध्यमिक विद्यालय व पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक पदाधिकारी व विद्यार्थी यांनी हातात तिरंगा झेंडाचे पवित्र जपत मोठी जनजागृती रॅली काढण्यात आली.
या काढण्यात आलेल्या रॅलीचे गावकऱ्यांनी स्वागत केले. शनिदेवाच्या पवित्र भूमीत शनिदेवाला स्मरून या रॅलीत ग्रामस्थ,शेतकरी,शनैश्वर देवस्थानचे सर्व पदाधिकारी, सुरक्षा अधिकारी, शनिशिंगणापूर ग्रामपंचायत चे सरपंच व पदाधिकारी, पोलीस पदाधिकारी, कर्मचारी,शिक्षक, मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
सहभागी झालेले यांनी हातात तिरंगा घेऊन गावातून फेरी काढून हर घर तिरंगा हा उपक्रम राबवून तिरंगाचा कोठेही अवमान होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. तिरंग्याचे महत्व विद्यार्थ्यांना स.पो.नि.रामचंद्र कर्पे व अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले.याप्रसंगी अध्यक्ष भागवत बानकर,सरपंच सौ. पुष्पाताई बानकर,माजी सरपंच बाळासाहेब बानकर, पोलीस पाटील ऍड.सायराम बानकर,सरचिटणीस आप्पासाहेब शेटे,विठ्ठल आढाव,उपकार्यकरी अधिकारी नितीन शेटे, माजी अध्यक्षप्रा.शिवाजी दरंदले,आर.के.शेटे,मुख्यध्यापक दिलीप लोडे, ग्रामसेवक दादासाहेब बोरुडे,शिक्षक स्टाप यांच्यासह पोलीस ठाण्यातील गोपनीय पोलीस अंमलदार वाघ सह,पोलीस कर्मचारी, अनेक आजी माजी विश्वस्त मान्यवर अभिमानाने सहभागी झाले होते.