जागतिक आदिवासी दिना निमित्ताने कल्यांण येथे रॅली चे आयोजन
कल्याण दि-९ आदिवासी कल्याणकारी सेवा संस्था कल्याण डोंबिवली महानगरपालिका, आदिवासी उत्सव समिती कल्याण / मुंबई व बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिना निमित्ताने
शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ५.०० वा. पर्यंत आचार्य अत्रे रंगमंदिर, सुभाष मैदानच्या बाजुला, कल्याण (प.) ते विजयनगर, कल्याण (पू.) येथे
आदिवासी कला,संस्कृती व आदिवासी नृत्य आणि भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

क. डों.म.पा. आयुक्त मा.डॉ.इंदुराणी जाखड यांच्या हस्ते उदघाटन होणार असून यावेळी श्री. हर्षल गायकवाड (अतिरीक्त आयुक्त क. डों.म.पा.) श्री.प्रभुदास भि. पंधरे (अध्यक्ष संयुक्त आदिवासी उत्सव समिती,कल्याण / मुंबई) श्री. रामनाथ भोजने (अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली) आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत वरील मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम व आदिवासी नृत्य, रॅलीचे ‘उद्घाटन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन
श्री. भागाजी स. भांगरे श्री.सागर रावजी धामोडे श्री. भरत एस. बुळे श्री. भरतकुमार पाटील श्री. चंद्रकांत पोळ श्री. अनिल गावित श्री. सुरेश फु. पवार श्री. विजय सरकटे आदिनी केले आहे