राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०८/०५/२०२३

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १८ शके १९४५
दिनांक :- ०८/०५/२०२३,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५२,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति १८:१९,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति १९:१०,
योग :- शिव समाप्ति २४:०९,
करण :- वणिज समाप्ति ०७:२०, बव २९:१५,
चंद्र राशि :- वृश्चिक,(१९:१०नं. धनु),
रविराशि – नक्षत्र :- मेष – भरणी,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०७नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:३६ ते ०९:१३ पर्यंत,

लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०५:५९ ते ०७:३६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:१३ ते १०:४९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३९ ते ०५:१५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:१५ ते ०६:५२ पर्यंत,

❀ दिन विशेष:
संकष्ट चतुर्थी(मुंबई चं.उ. २१:५३), घबाड १९:१० नं., भद्रा ०७:२० नं. १८:१९ प.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १८ शके १९४५
दिनांक = ०८/०५/२०२३
वार = इंदुवासरे(सोमवार)

मेष
शस्त्रक्रीया सारख्या घटना संभवतात. मानसिक उत्तेजना विद्रोह वाढेल. नोकरीत अत्यंत सावधानीपूर्वक वाटचाल ठेवावी. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगारात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा.आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा.

वृषभ
नोकरीत आपल्या कामाप्रती सजग राहा. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुंटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदार नोकरीत असेल तर प्रमोशन होण्याची शक्यता आहे.

मिथुन
मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावू शकते. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. मोठे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत.

कर्क
धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. आरोग्याच्या थोड्याफार समस्या उद्भवतील. संततीकडून शुभ संदेश मिळतील. समाधानकारक दिनमान असेल.

सिंह
नोकरीतील बदल मोठे फायदेशीर ठरतील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. पत्नीसोबत गोडी व दुरावा असे दोही फळे अनुभवास येतील. परदेशगमन प्रवास घडणार आहे. सुखदायी दिवस व्यतीत कराल.

कन्या
नोकरीत नवीन योजनेवर केलेले प्रयत्न सफल होतील. नोकरीत वरिष्ठांकडून केलेल्या कामासाठी दाद मिळेल. हातून निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. राजकीय सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील. मित्रमंडळींचे व कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभणार आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. मनोबल उंचावेल.

तुळ
विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचनमनानाची गोडी वाढेल. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारानिमित्त प्रवास होईल. हानी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद संभवतात. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक
नोकरी रोजगारात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलांकडून समाधान मिळेल. आत्मविश्वास द्विगुणित करणारे दिनमान आहे. प्रवास हितकर होतील. मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

धनु
मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दूरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील. आशावादी दृष्टीकोनातून सतत विचार करावा. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक हानीची शक्यता आहे. गुंतवणूक टाळा. प्रवासात विशेष काळजी घ्या.

मकर
वरिष्ठांचे गुरुजनांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. नोकरी व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल. मान-सम्मान वाढेल. नोकरीत अचानक बदल घडतील. संशोधन क्षेत्रातील मंडळीना मान सन्मान पदवी पुरस्कार मिळेल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. वादविवाद मात्र टाळावे. लाभाच्या दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील.

कुंभ
आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. आजचे प्रयत्न सफलदायक ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकूल बदल होईल. शत्रुवर मात कराल. कोर्टकचेरीच्या कामास गती मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहील. व्यापार रोजगारात अनुकूल अशी सफलता मिळेल.

मीन
तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. स्पर्धापरिक्षेत यश संपादन होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. बँकेत व्यवहार करताना जपून करावा. मुलांकडून समाधान लाभेल. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. दूरवरचे प्रवास लाभदायक होतील.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button