पारनेर प्रतिनिधी :-
पारनेर तालुक्यातील शहाजापुरच्या डोंगरावरील माऊली कृपा गोशाळेत सर्वाधीक उंचीवर तिंरगा फडकला .
शहाजापुर ता पारनेर येथील डोंगराची उंची समुद्र सपाटीपासुन जवळजवळ ९०० मिटरच्या आसपास कदाचित त्यापेक्षा ही उंच आहे . आणि त्यातलीत्यात उंच टेकाडावर सत्तर ऐंशी फुट उंच्चीचा ध्वजस्तंभ उभारुन शनिवारी येथे सर्वाधीक उंचीवर तिंरगा डोलाने फडकला .
माऊली कृपा गोशाळेचे संस्थापक ह.भ.प नितीन महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुरेंद्र शिंदे व सचिन शिंदे यांच्या संकल्पनेतुन भव्य तिंरगा फडकवण्यात आला . शहाजापुरची डोंगररांग ही अकोले तालुक्यातील डोंगर रांगेच्या खालोखाल जिल्ह्यातील सर्वाधीक उंचीची डोंगर रांग आहे . या डोंगरावर स्वातंत्र्य पुर्व काळात इंग्रज शासक आपले आजारी किंवा जखमी सैनिक या उंच डोंगरावर आराम करण्यासाठी ठेवत अशे अशी इतिहासात नोंद आढळते . आज त्याच गुलमी इंग्रजांच्या तावडीतुन देश स्वतंत्र होऊन आपल्या स्वातंत्र्याचा आमृत मोहत्सव साजरा करत आहे . ज्या विशाल उंचीच्या डोंगरावर इंग्रजाचे पाऊल पडाले होते . आज तेथेच देशाचा तिंरगा स्वाभिमानाने फडकत होता .
देशाला स्वातंत्र्य मिळवुन ७५ वर्षे झाल्याने देशभर हर घर तिंरगा हे अभियान राबवत घरोघरी तिंरगा फडकवत स्वागतचा अमृत मोहत्सव साजरा करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत . देशातील नागरिकही मोठ्या उत्साहाने या अभियानात सहभागी झाले आहेत .त्याच अनुशंगाने शनिवारी शहाजापुरच्या डोंगरावरील उंच ठिकाणी तिंरगा फडकवण्यात आला . हे ठिकाण जिल्ह्यातील उंच ठिकाणा पैकी एक आहे . शनिवारी सकाळी या उंच डोंगरावर डौलाने तिंरगा आकाशात जात असताना कोवळ्या प्रकाश किरणासह वरुण राजाच्या हलक्या सरीही स्वागताला सज्ज होत्या डोंगर रांगावर धुक्याची चांदर पसरली होती .अशा मधधुंद वातावरणार तिंरगा मोठ्या दिमाखाने फडकत होता. यावेळी ह.भ.प नितिन महाराज शिंदे सुरेंद्र शिंदे सचिन शिंदे डॉ अमोल टकले नितीन बेंंद्रे ह,भ.प.प्रकाश महाराज अनिल मोटे सह गोशाळेवरील गोसेवक उपस्थित होते .
