अर्नाळ्यात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा ..…

अर्नाळा– स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अर्नाळा ग्रामपंचायतीने आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते , गावातील शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला व रांगोळी स्पर्धा , अर्नाळा सोशल वर्क ग्रुप,जैन समाज विरार व ग्रामपंचायतीच्या सयुंक्त विद्यमाने समुद्र किनाऱ्यावर स्वछता अभियान ,वृक्षारोपण कार्यक्रम अंतर्गत सेंट पीटर शाळा व जि प शाळा सुभाष लेन येथे फादर जॉन कुशर व मुख्याध्यापिका मंदा पाटील व सरपंच ह्यांच्या हस्ते देशी झाडे लावण्यात आली .,
अंगणवाडी च्या बाळ – गोपाळांची पंगत कार्यक्रम अंतर्गत उर्दू शाळा व अंगणवाड्यामध्ये अर्नाळा व्यापारी संघटनेमार्फत फळांचे वाटप करण्यात आले , हर घर तिरंगा अंतर्गत गावातील प्रत्येक घरावर झेंडा फडकला पाहिजे ह्याकरिता शासनाने उपलब्ध केलेले झेंडे ग्रामस्थांना पोहोचवून गावातील सुमारे 3500 घरांवर झेंडे ग्रामस्थांनी फडकविले .
दि 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहण केल्यानंतर याग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींजींच्या स्मूर्ती स्मरकास अभिवादन केले ,स्वराज्य रथ यात्रेचे आयोजन केले होते ,ह्या यात्रेतझाशीची राणी लक्ष्मीबाई ब्रिटिशां विरुद्ध लढतानाचे। दृश्य रथावर डॉ एन पी गाळवणकर इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थांनी साकारण्यात आले होते , तसेच डॉ दि ज गाळवणकर विद्यामंदिर डॉ एन पी गाळवणकर इंग्रजी शाळा ,सेंट पीटर इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये पारनाका येथे सादर केली ,ह्या यात्रेत गावातील युवक ,तरुण ,ज्येष्ठ ग्रामस्थ मच्छिमार ,शेतकरी सहकारी संस्थांचे पदाधिकारी आदिवासी संघटना ,व्यापारी संघटना , विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी ,आजी माजी ग्रामपंचायत सदस्य ,माजी सरपंच ,आजी माजी जिल्हा परिषद सदस्य ,प स सदस्य व हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते,
यात्रा पार नाका येथे आल्यावर देशभक्तीपर गाण्याच्या ठेक्यावर ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला व भारत देशाच्या गौरव करत जोरदार घोषणा दिल्या , यात्रेचा समारोप ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला , अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 वय व त्याहून अधिक असलेल्या ग्रामस्थांचा ह्यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ,ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले .