शेवगाव शहरात ऐतिहासिक तिरंगा रॅली आमदार मोनिका राजळे सह सर्वपक्षीय नागरिकांचा सहभाग

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्ष, संघटना जाती-पातीचा भेदभाव दूर करत शेवगाव शहरात ऐतिहासिक तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघा मार्फत 111 फूट लांब व दहा फूट रुंद तिरंग्याची मिरवणूक व भारत मातेची प्रतिमा असलेला रथ या रॅलीचे आकर्षण ठरला.
तिरंगा रॅली यशस्वी होण्याकरिता आमदार मोनिकाताई राजळे यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि सर्व राजकीय पक्ष संघटना यांची बैठक घेऊन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.
शेवगाव शहरांतर्गत खंडोबा मैदान येथून तिरंगा रॅलीचे प्रस्थान होऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चौक, राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नवीन कोर्ट, क्रांती चौक, महात्मा गांधी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे प्रस्थान होऊन शहरातील खालची वेस येथील सभागृहात समारोप झाला. यावेळी मार्गात येणाऱ्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या भव्य दिव्य तिरंगा रॅलीचे सुरुवात होताच वरून राजाचे आगमन झाले परंतु देश प्रेमाने भारावून गेलेल्या विद्यार्थी, नागरिक यांच्यावर याचा किंचितही परिणाम झालेल्या दिसला नाही, पावसातही हे तिरंगा रॅली चालत राहिली.
यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या संपूर्ण देशात देशाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. यामध्ये आपले राज्य प्रथम क्रमांकावर असून शेवगाव शहरात निघालेली ही तिरंगा रॅली ऐतिहासिक आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहव्यात, स्वातंत्र्यसंग्रमातील अज्ञात नायक, क्रांतिकारी यांचे स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे, देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी याच उद्देशाने स्वातंत्रता अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने सादर करण्याचा मानस आहे. यावेळी त्यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकावावा व त्याचे पावित्र्य जपावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
सदर तिरंगा रॅली यशस्वी होण्यासाठी शेवगाव नगरपरिषद तसेच महसूल प्रशासन, पंचायत राज प्रशासन, शाळा, महाविद्यालय, विविध संघटना यांनी मोठे कष्ट घेतले.
यावेळी प्रामुख्याने आमदार मोनिकाताई राजळे, प्रांत अधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार छगन वाघ, नगरपरिषद मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव, जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, शिवाजीराव काकडे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, मनसेचे नेते गणेश रांधवणे, शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, ज्येष्ठ नेते अशोक आहुजा, सुनील रासने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर कृष्णा देहडराय, डॉक्टर नीरज लांडे, जगदीश धूत, हरीश शिंदे, सागर फडके, महेश फलके, गणेश कोरडे, दिगंबर काथवटे , प्राध्यापक नितीन मालानी, राष्ट्रवादीचे संजय फडके, अजिंक्य लांडे, भाजपाचे ताराचंद लोढे, रवींद्र सुरवसे, भीमराज सागडे, संदीप वाणी, आशाताई गरड, रोहिणीताई फलके, उषाताई कंगनकर पांडुरंग तहकीक तसेच शेवगाव शहरातील विद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक वृंद, नागरिक उपस्थित होते.
