गुरेवाडी येथील श्यामजी बाबा विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

क्रांतिकारकांच्या कार्याला प्रणाम करण्याचा दिवस :सभापती काशिनाथ दाते
पारनेर प्रतिनिधी
श्यामजी बाबा विद्यालय गुरेवाडी ता. पारनेर या विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनाचे ध्वजारोहण गावातील ज्येष्ठ नागरिक मारुती गुंजाळ यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर होते कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती दाते सर म्हणाले भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी केलेल्या कार्याला प्रणाम करण्याचा दिवस आहे. मी माझे शिक्षण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत घेतले स्वतःच्या गावातील विद्यार्थी विशेषतः विद्यार्थिनींना शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी या उदात्त हेतूने २५ वर्षांपूर्वी १९९७ ला मी संस्थेच्या माध्यमातून येथे शाळा सुरू केली. विद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे आपले कर्तव्य बजावत असून मागे वळून पाहून विद्यालयाच्या प्रगतीसाठी आपलं योगदान देण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. १९९७ पासून आजतागायत विद्यार्थी संस्थेचा आलेख उंचावत चाललेला असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामाचे त्यांनी कौतुक केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबद्दल शासनाने राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक करून स्वतःचे कर्तव्य आणि जबाबदारी आहेत याचीही माहिती त्यांनी दिली.
विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत ८ ऑगस्ट पासून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत ग्रामउत्कर्ष मंडळ चे अध्यक्ष डॉ. प्रदीप दाते व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत तिरंगा ध्वजाची वाटप करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रमात विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी अतिशय सुंदर अशी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमानिमित्त विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात ३५ बेंच व २५० वॅटचा स्पीकर मशीन देण्याचे जाहीर केले.

यावेळी अर्जुन गाजरे, माजी सैनिक बाळासाहेब गगे, सावळेराम दाते, खंडू बेलकर, रोहिदास गुंजाळ, खंडू गुंजाळ, प्रकाश घाडगे, विठ्ठल शिंदे, अकबर इनामदार, पांडुरंग भालके, चेअरमन संतोष गुंजाळ, बाळासाहेब गुंजाळ, संतोष सुखदेव गुंजाळ, विकास दाते, विजया शिंदे, अशोक गुंजाळ, स्वाती कडुसकर, साक्षी कडूसकर, एकनाथ रोहकले, मयूर आहेर, राहुल आहेर, सुशांत निमसे, विकास गुंजाळ, जिजाभाऊ गुंजाळ, प्रशांत गुंजाळ, अजित गुंजाळ, अतुल गुंजाळ,मिठु इनामदार, सुनील गुंजाळ, अंकुश घाडगे, किरण शिंदे, दत्तात्रय घाडगे, वैभव गुंजाळ, गौतम बेलकर, बाबाजी गुंजाळ, रमेश शिंदे, गंगाधर शिंदे, अशोक घाडगे, विश्वास दाते, भाऊसाहेब गुंजाळ, पुनाजी दाते, मयूर शिंदे, योगेश गुंजाळ, अतुल गुंजाळ, संदीप गगे, महादु निमसे, रावसाहेब निमसे, ज्ञानदेव गगे, निवृत्ती गुंजाळ, सखाराम शिंदे, शांताराम गुंजाळ, सचिन आहेर, अजिंक्य शिंदे, शिवाजी दाते, सुनील दाते, बबन बेलकर, अशोक शिंदे, सोमनाथ कडूसकर, संकेत गुंजाळ, रामदास गुंजाळ, निलेश दाते, प्रवीण घाडगे, रेश्मा गुंजाळ, शिवबाई घाडगे, सुगंधा गुंजाळ, स्वप्नाली हिंगडे, वैशाली रोहकले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबासाहेब दाते यांनी केले. सूत्रसंचालन गुंजाळ सर,आहेर सर यांनी केले तर आभार झावरे सर यांनी मानले.