आजचे पंचांग व राशिभविष्य दि १९/०५/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
j
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २९ शके १९४४
दिनांक :- १९/०५/२०२२,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५६,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति २०:२४,
नक्षत्र :- पूर्वाषाढा समाप्ति २७:१७,
योग :- साध्य समाप्ति १४:५७,
करण :- बव समाप्ति ०९:५९,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – कृत्तिका,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०२:०३ ते ०३:४१ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०५:५६ ते ०७:३३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०२:०३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०३ ते ०३:४१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:१८ ते ०६:५६ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
संकष्ट चतुर्थी(मुंबई चं.उ. २२:४७), घबाड २०:२४ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २९ शके १९४४
दिनांक = १९/०५/२०२२
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
दिवस समाधानात जाईल. होकारात होकार मिसळावा लागेल. प्रसंगातील अनुकूलता लक्षात घ्यावी. अचानक समोर आलेल्या कामातून लाभ संभवतो. कामातील दिरंगाई टाळावी.
वृषभ
प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. नियमांना सोडून वागू नका. फसव्या मित्रांपासून सावध राहावे. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. वडिलोपार्जित कामातून धनप्राप्ती होईल.
मिथुन
काही वेळेस तारेवरची कसरत करावी लागू शकते. हातातील चांगली संधि सोडू नका. नियोजन करून कामे करावीत. प्रवासात भरकटू नका. वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या.
कर्क
कामाच्या ठिकाणी चिडचिड वाढू शकते.एकमेकांच्या सहकार्याने कामे करावीत. परदेशी कामातून लाभ संभवतो. मोहाला बळी पडू नका. खिशाला कात्री लागणार नाही याची काळजी घ्यावी.
सिंह
शक्यतो अकारण होणारे गैरसमज टाळावे लागतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. कोणत्याही गोष्टीची जास्त चिकित्सा करत बसू नका. प्रयत्नात कसूर करू नका. तुमच्या तिजोरीत भर पडेल.
कन्या
आत्मसंयमन करावे लागेल. अतिधाडस करायला जाऊ नये. स्वयं शिस्त पाळणे आवश्यक आहे. नियोजनबद्ध कामात सफल व्हाल. व्यावसायिक प्रवास सावधानतेने करावेत.
तूळ
जोडीदाराला अचानक लाभ होईल. जवळच्या लोकांना दुर्लक्षित करू नका. बेफिकिरीने वागून चालणार नाही. कठोर परिश्रमास पर्याय नाही. जवळचा प्रवास घडेल.
वृश्चिक
दिवसभर कार्यरत राहावे लागेल. भाऊबंदकीत वाद संभवतात. वाहन चालवताना सतर्क रहा. जोडीदाराचा शब्द प्रमाण मानावा लागेल. घरगुती कामात व्यस्त राहाल.
धनू
आज मनाप्रमाणे वागण्याचे ठरवाल. खेळाडूंनी कसरतीत कसूर करू नये. थोड्याशा यशाने उतू नका. सारासार विचारावर भर द्या. मधुमेहींनी खाण्याची पथ्ये पाळावीत.
मकर
सध्याच्या परिस्थितीत बिनधास्त वागून चालणार नाही. अध्यापक वर्गावर जबाबदारी वाढू शकते. जोडीदारा सोबतचे वाद वाढू देऊ नका. वात विकार बळावू शकतात. मानसिक स्थैर्य जपावे.
कुंभ
दूरच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. आततायीपणे वागून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींवर वाद घालू नका. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या. नवीन ओळखी वाढवाव्यात.
मीन
थोडी आक्रमक भूमिका घ्याल. स्त्री वर्गावरून वादाचा प्रसंग येऊ शकतो. कामात भावंडांची सहकार्य घेता येईल. तांत्रिक बाबींमध्ये बारीक लक्ष घालावे. हातातील कामे सुरळीत पार पडतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर