नेवासा पोलीसांनी जप्त केला 4,36,000/- रुपयांचा अवैध दारूचा साठा!

दत्ता शिंदे /माका प्रतिनिधी
नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विजय करे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे छापा टाकत देवगाव येथे ४ लाख ३६ हजाराचा अवैध दारूसाठा पकडला
, देवगांव (ता.नेवासा जि. अहमदनगर) येथील राहणार महेश बाळासाहेब दारकुंडे याचे
राहते घराचे समोर पत्र्याचे शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीर दारुचे बॉक्स विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेले आहेत अशी खात्री लायक बातमी मिळाल्याने त्यांनी त्यांचे अधिनस्त असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री.समाधान भाटेवाल, पो.ना राहुल यादव, पो .कों.गणेश ईथापे असे अधिकारी व पोलीस अंमलदार यां सह श्री.समाधान
भाटेवाल, पोना राहुल यादव, पोको गणेश ईथापे यांनी महेश बाळासाहेब दारकुंडे याचे राहते घराचे समोर असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये छापा टाकला , सदर ठिकाणी कासबर्ग कंपनीच्या बिअरचे एकुण 158 बॉक्स प्रत्येकी बॉक्स मध्ये 12 बॉटल अशा वर्णनाचा एकुण 4,36,080/- रुपये किंमतीच्या बियरच्या बॉटल मिळून आल्या सदरचे बॉक्स पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त करुन नेवासा पोलीस ठाणे येथे आणलेल्या आहेत.
या कारवाईच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना/नितीन भताने हे करीत आहे
सदर कारवाई .पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील अहमदनगर, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर श्रीरामपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके उपविभाग शेवगांव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विजय मा. करे पोलीस निरीक्षक, श्री.समाधान भाटेवाल, पोना/राहुल यादव, पोकों/गणेश ईथापे यांनी संयुक्तपणे केली