स्व. मधुकरराव पिचड यांच्या आठवणी न विसरण्या सारख्या

स्व. पिचड यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पिचड कुटुंबाच्या पाठीमागे रहावे
– मंत्री ना. नरहरी झिरवाळ
विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
माजी मंत्री स्व मधुकरराव पिचड यांनी आमदर , मंत्री म्हणून ज्या ज्या क्षेत्रांमध्ये काम आहे ते निश्चितच आदर्श होते . त्यांच्या आठवणी आजही आमच्या डोळ्यासमोर दिसतात निळवंडे धरणाचे शिल्पकार म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे. त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांना या पुढच्या काळामध्ये आमच्याकडून जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणाने केलं जाईल आणि स्व पिचड यांचे जे अपूर्ण कार्य राहिलेले आहे. ते पूर्ण करण्यासाठी निश्चित मदत करू. असे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवळ म्हणाले
त्यांनी आज स्व मधुकरराव पिचड कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेतली यावेळी ते म्हणाले की स्व मधुरकरराव पिचड यांची सहकार क्षेत्र व प्रशासनमध्ये मोठी पक्कड होती. आदिवासी भागांमध्ये। त्यांचे काम पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने शिल्पकार म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे.
भविष्यात त्यांचे सुपूत्र वैभवराव पिचड यांना निश्चितपणाने सहकार्य केले जाईल आणि माजी मंत्री पिचड यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पिचड कुटुंबाच्या पाठीमागे रहावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पिचड यांच्या पत्नी श्रीमती हेमलता पिचड यांची राजूर येथे निवासस्थानी भेट घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
स्व मधुकरराव पिचड यांच्या अस्थी विसर्जना साठी त्यांचे सुपुत्र वैभवराव पिचड काशी ला गेल्याने त्यांची भेट झाली नाही यावेळी उपसरपंच संतोष बनसोडे ,गोकुळ कानकाटे, सी बी भांगरे, अनंत घाणे , पांडुरंग खाडे ,निलेश साकोरे गंगाराम धिदळे आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते