राजापूर महाविद्यालयात नवागतांच स्वागत

प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला महाविद्यालय राजापूर दिनांक 12 जुले 2023 रोजी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत ,याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ,स्कूल कमिटी चेअरमन भाऊसाहेब हासे यांनी भूषवले .कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष कडलग सर यांनी केले . आपल्या महाविद्यालयीन जीवनात अनेक वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात नगर जिल्ह्याचे नाव मोठे करणारे व महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेचे उपाध्यक्ष निखिल नगरकर यांचे महाविद्यालयीन जीवन आयुष्यात यशस्वी होण्याची गुरकिल्ली या विषयावर अनमोल मार्गदर्शन केले.
आजचा तरुण आणि तरुणी यांची वास्तविक परीस्थिती याचे विविध दाखले देऊन स्तुत्य मार्गदर्शन केले. आई वडील व गुरुजनांना कधीही विसरू नका मोबाईल पेक्षा वाचनाकडे लक्ष दिल्यास आपले आयुष्य बदलू शकते. अशा प्रकारचे अनेक दाखले देऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमास नूतन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर एम. खतोडे तसेच ज्युनिअर कॉलेजचे इन्चार्ज नवले सर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोरडे संतोष यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन प्रा.गडाख वैभव यांनी केले.महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला.