संगमनेर चे अरविंद गाडेकर यांचा पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र मोहत्सवात सन्मान !

संगमनेर – युवा संवाद सामाजिक संस्था आणि कार्टूनिस्ट कम्बाईन या संस्थांनी आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र मोहत्सव बालगंधर्व कलादालन पुणे येथे आयोजित केला होता. या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उदघाटन जेष्ठ पत्रकार अविनाश भट, प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी, व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे , प्रसिद्ध व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख , लहू काळे , गणेश जोशी, आदी उपस्थित होते.
देशविदेशातील व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन या वेळी बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले . व्यंगचित्र मोहत्सवाचे आयोजक व्यंगचित्रकार धनराज गरड यांनी हा महोत्सव भरविण्यात पुढाकार घेतला.
संगमनेरचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचे व्यंगचित्र या व्यंगचित्र प्रदर्शनात समाविष्ट करण्यात आली होती . यावेळी आयोजक धनराज गरड आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि मार्मिकचे मुखपृष्टकार गौरव सर्जेराव यांचे हस्ते बालगंधर्व कलादालनात अरविंद गाडेकर यांचा सन्मानचिन्ह , शाल देऊन सन्मान करण्यात आला.याबद्दल अरविंद गाडेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी अमोल गवांदे , सुप्रिया गवांदे , शरद गाडेकर , राजेंद्र भालेराव हे उपस्थित होते.
राजकीय , सामाजिक , पर्यावरण , आधुनिक तंत्रज्ञान , प्रदूषण , पाणी टंचाई , अशा विविध विषयावर मार्मिक टीकाटिपणी करणारी व्यंगचित्रे मोहत्सवातील प्रदर्शनात होती.