अहमदनगर

नगर मध्ये १५ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचा समारोप

साहित्य क्षेत्राकडे नव्या पिढीचा कल व उत्साह वाढवा,

अहमदनगर शहरात २५ कोटी खर्चाचे अद्ययावत ग्रंथालय – खा.सुजय विखे


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक मोठमोठे साहित्यिक वसांस्कृतिक कार्यक्रम होतात, साहित्य क्षेत्रात रुची दाखवणारे आणि शब्दगंध सारखे साहित्य संमेलन यशस्वी करणारे लोक प्रतिनिधी म्हणून आ. संग्राम भैय्या जगताप यांची आज नवी ओळख निर्माण झाली आहे, त्यामुळे नवोदित साहित्यिकांना निश्चितच प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खा. डॉ. सुजयदादा विखे यांनी केले.


शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य व अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय येथे उभारण्यात आलेल्या पद्मश्री कवी ना. धो. महानोर साहित्य नगरीत आयोजित शब्दगंध साहित्य संमेलनाच्या समारोप व पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

संमेलनाध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर, स्वागताध्यक्ष आ. संग्रामभैय्या जगताप, मा.आ.अरुण काका जगताप, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.आ. शिवाजीराव कर्डिले, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, घनश्याम शेलार, मनपा चे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, प्रा. माणिकराव विधाते, प्राचार्य शिवाजीराव देवढे, कॉ. बाबा आरगडे, प्राचार्य जी. पी. ढाकणे, हमाल पंचायत चे अध्यक्ष अविनाश घुले,संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक, सचिव सुनिल गोसावी,भगवान राऊत, प्रा.डॉ. अशोक कानडे, माजी नगरसेवक अशोक कानडे, धनंजय जाधव, बाळासाहेब पवार, प्रा.डॉ. गणी पटेल, डॉ. विजय भंडारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


यावेळी बोलताना खा.सुजय विखे पुढे म्हणाले की, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. मात्र ही अवघड गोष्ट आ. संग्राम जगताप यांनी संमेलन घेऊन सोपी करून दाखवली. साहित्य क्षेत्राकडे नव्या पिढीचा कल व उत्सव वाढवा, साहित्याबद्दल त्यांना अवड निर्माण व्हावी यासाठी आगामी काळात अहमदनगर शहरात २५ कोटी रुपये खर्चाचे सुसज्ज व अद्ययावत ग्रंथालय उभारण्यात येणार असून पुढील साहित्यिक कार्यक्रम आपण ग्रंथालयाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी घेऊ असे ते म्हणाले.
स्वागताध्यक्ष आ. संग्राम जगताप म्हणाले की, शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने २ दिवस राज्यभरातील नामवंत व नवोदित साहित्यिक, लेखक, कादंबरीकार, कथाकार, कवी, उपस्थित होते. साहित्याच्या अनेक विषयांवर चर्चा, परिसंवाद, मुलाखती, चित्र प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, पुस्तक मेळा, संगीत मैफल असे भरगच्च कार्यक्रम झाले. या कार्यक्रमास ही साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला याचे मला समाधान आहे. शब्द पुस्तकात उतरविण्याचे काम शब्द गंध करते. संमेलनातून विचारांची देवाण घेवाण होते. एकमेकांशी जोडले जातो. हे काम अजून पुढे नेण्याची गरज आहे. डॉ. बी. जी. शेखर पाटील, डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांमुळे आमच्या सारख्या तरुणांमध्ये साहित्याची आवड निर्माण होते असे ते म्हणाले.
संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले की, एखादे छोटे रोपटे वाढविण्यासाठी त्याला जमीन चांगली लागते. खत पाणी घालावे लागते आणि त्याची चांगली राखण देखील करावी लागते. तसेच एखादे छोटे मुल वाढविण्यासाठी त्याला ज्ञान, संस्कार, शिस्त, प्रेरणा, प्रोत्साहन देण्याची गरज असते. ते काम शब्दगंध च्या माध्यमातून सुरू आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. अशा प्रकारच्या साहित्य संमेलनातून आपल्याला आपली भूमिका समजते. चांगले पेरले तर उद्या चांगले उगवेल म्हणून उद्याच्या पिढीसाठी चांगल काहीतरी करूयात. आचार, विचार, आहार आणि विहार या गोष्टी माणसांना संस्कारक्षम बनवितात. आम्ही जर शालीन व सुसंस्कृत असू तर आमची पुढची पिढीही चांगली घडेल असे ते म्हणाले.
यावेळी साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कुलगुरू सर्जेराव निमसे, डॉ. बी. जी. शेखर पाटील, घनश्याम शेलार यांचीही भाषणे झाली. सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला गोसावी ,रज्जाक शेख व डॉ. रमेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. शाहीर भारत गाडेकर यांनी गायलेल्या वंदन माणसाला या गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमास अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, प्राचार्य चंद्रकांत भोसले, विलास साठे, रेश्मा आठरे प्राचार्य जी बी ढाकणे, अरविंद शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या दिवसाच्या विविध सत्रात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त प्रशांत खांडकेकर, उपायुक्त अजित निकत ,श्रीनिवास कुरे , विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, कोपरगाव चा माजी नगराध्यक्ष ऐश्वर्याताई सातभाई, श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती प्रा. सुनीता गायकवाड यांच्या सह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन समाधान व्यक्त केलं. ग्रंथ खरेदीचा आनंद जवळपास दोन लाख रुपयाची पुस्तक विक्री या संमेलना छायाचित्र प्रदर्शन चित्र प्रदर्शन व शिल्पकलेचे प्रदर्शन बालगोपालांसह सर्वांनी रात्री नाट्य परिषदेच्या सहकार्याने नाना घाई केलीत हे विनोदी नाटक सादर यावेळी संग्राम भैय्यांच्या हस्ते सर्व नाट्यकर्मींचा सत्कार करण्यात दिवसभराच्या तीन सत्रांमध्ये झालेल्या काव्य संमेलनात मान्यवरांसह नमोदितांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बबनराव गिरी, सुभाष सोनवणे, राजेंद्र फंड, प्रा. तुकाराम गोंदकर, डॉ.अनिल गर्जे, भाऊसाहेब सावंत, राजेंद्र चोभे, कैलास साळगट, प्रमोद येवले, स्वाती ठुबे, संगीता गिरी, आरती गिरी, शाहीर वसंत डंबाळे,डॉ. किशोर धनवटे,राजेंद्र पवार, मारुती सावंत,स्वाती राजेभोसले, सरोज अल्हाट, जयश्री झरेकर, शर्मिला रणधीर, सुदर्शन धस,डॉ.बापू चंदनशिवे, डॉ.अनिल पानखडे,बाळासाहेब शेंदूरकर, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, डॉ.संजय दवंगे,सुरेखा घोलप, संपत नलावडे,दिशा गोसावी, हर्षली गिरी, कल्याणी सावंत, ऋषिकेश राऊत, स्नेहल रूपटक्के, निखिल गिरी यांच्यासह शब्दगंधच्या संपूर्ण टीम ने परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button