सेवक कामगार संघटनेकडून वालनेस हॉस्पिटल येथे होणाऱ्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा

डॉ. शाम जाधव
सांगली- मिरज दिनांक १९/१०/२०२४ रोजी येथील आरोग्य पंढरीला नाव लवकिक करणारे सर वालनेस हॉस्पिटल म्हणजेच (मशीन हॉस्पिटल) येथील कामगारांची गेले साडेतीन-चार वर्षांपासून फसवणूक आणि पिळवणूक होत आहे त्यांचा पगार त्यांचा एलआयसी त्यांचा ए.स.आय. अशा अनेक प्रकारच्या सुविधा त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आलेले आहेत जवळजवळ १७ मयत कामगारांची सुद्धा येणे पैसे बाकी आहेत आणि तेथील व्यवस्थापन हे फक्त फक्त कामगारांचा वेळ काढण्यासाठी चालढकल काम करत आहेत आणि आता कामगारांची अवस्था जीव देण्याच्या पलीकडे होऊन गेलेले असताना त्यांची कोणीही दखल घेत नाही दुर्भाग्य हे आहे की या विधानसभा क्षेत्रामध्ये कामगार मंत्री असताना सुद्धा कामगारांची जर अशी अवस्था होत असेल तर मग ते कामगार मंत्री पदाचा काय फायदा असं कामगाराकडून सवाल होत आहे या सर्व वेदनाच्या नंतर तेथील स्थानिक कामगारांनी मिरज विधानसभा क्षेत्रात राजकीय पक्षांना मतदान करण्याचे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सेवक कामगार संघटने कडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर संघटने कडून आश्वासन आणि गवाही देण्यात आली की त्यांच्या न्याय हक्कासाठी सेवक कामगार संघटना त्या कामगार सदस्यांच्या पाठीशी राहून खांद्याला खांदा लावून त्यांना न्याय मिळवून पर्यंत लढा देऊ तसेच सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना भेटून तसेच सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालय सुद्धा भेट देऊन या कामगारांच्या न्यायासाठी कुठली भूमिका घ्यावे लागेल त्याचा निर्णय ठरून पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी लढा उभा करण्यात येणार असून आचारसंहितेनंतर मोठ्या जन समूहाच्या सोबत संविधानिक मार्गाने जन आंदोलन, आक्रोश मोर्चा, रस्ता बंद या मार्गाने त्यांना न्याय मिळून पर्यंत लढा देऊ त्या यामध्ये जर वित्तहानी व जीवित हानी झाल्यास शासन प्रशासन व हॉस्पिटलचा चे व्यवस्थापनाची जबाबदार राहील अशी माहिती देण्यात आली त्याचबरोबर सर्व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सेवक कामगारांना आव्हान करण्यात आले की या लढ्यामध्ये तुम्ही सुद्धा सामील होऊन आरोग्य क्षेत्राची रक्षा केली पाहिजेल त्यावेळेस वालनेस हॉस्पिटल चे सर्व कर्मचारी व संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमरफारुक ककमरी,
जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे, जिल्हा महासचिव देविदास हावळे,शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, जिल्हा संघटक सचिन वाघमारे, जिल्हा संघटक मानतेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.