देशाच्या रक्षण करणाऱ्या जवांनाप्रती कृतज्ञता !

अकोले प्रतिनिधी
राष्ट्रीय मानव अधिकार अकोले तालुका संघटना, इनरव्हिल क्लब , ध्येय लढा महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सव निमित्त हुतात्मा स्मारक अकोले येथे माजी सैनिकांना संघटनेच्या वतीने राख्या बांधून देशाच्या रक्षण करणाऱ्या जवांनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर शहीद जवानांना हुतात्मा स्मारक अकोले येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेच्या अध्यक्षा सौ दिलशाद सय्यद आणि इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा श्रीम.प्रतिभा साबळे , दिलशाद शेख यांनी केले….
या कार्यक्रमासाठी माजी सैनिक रहाणे,मेजर जगताप साहेब,मेजर सचिन नवले, मेजर मोहम्मद रफीक शेख, डॉ. गोर्डे, मेजर झोळेकर साहेब, बाळासाहेब अस्वले लगड ताई, गोडे ताई,कांचन गोडे ,हांडे ताई ,खेडकर ताई ,निशा मोरे, हेमलता सदगीर, अर्चना राहुरकर उपस्थित होते..